नशेसाठी औषध न दिल्यामुळे गर्दुल्ल्यांची मेडीकलमध्ये तोडफोड, घटना सीसीटीव्हीत कैद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नशा करण्यासाठी मेडीकल दुकानदाराने औषध न दिल्यामुळे दोन नशेखोर तरुणांनी मेडीकल दुकानात तोडफोड केली आहे. कल्याण जवळील बनेली परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला असून या तरुणींनी दुकानात घातलेला राडा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री बनेली भागातील आंबेडकर चौक भागात वेलकम मेडीकल या दुकानात दोन नशेखोर तरुण केले. त्यांनी मेडीकल दुकानमालकाकडे कोरेक्स औषध मागितलं. परंतू डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय हे औषध मिळणार नाही असं दुकानदारांने या तरुणांना सांगितलं. या तरुणांनी पुन्हा एकदा मागणी करुनही दुकानदाराने औषध न दिल्यामुळे या गर्दुल्ल्यांनी तोडफोड करायला सुरुवात केली.

दोन्ही गर्दुल्ल्यांनी मेडीकल दुकानदाराला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. इतकच नव्हे तर दुकानातील काऊंटरमध्ये ठेवलेल्या वस्तू, फ्रिजची तोडफोड या तरुणांनी केली. या घटनेबद्दल टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून सीसीटीव्हीच्या आधारावर आरोपींचा शोध घेतला जात आहे,

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

उल्हासनगर : रिक्षाचालकाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपी अटकेत

    follow whatsapp

    ADVERTISEMENT