Covid 19 : मुंबईत दिवसभरात दुसऱ्या लाटेच्या उच्चांकापेक्षाही सर्वाधिक 20181 रूग्णांची नोंद
(प्रातिनिधिक फोटो)

Covid 19 : मुंबईत दिवसभरात दुसऱ्या लाटेच्या उच्चांकापेक्षाही सर्वाधिक 20181 रूग्णांची नोंद

मुंबईत कोरोनाचा कहर सुरू झाला आहे. दिवसभरात 20 हजार 181 रूग्णांची नोंद झाली आहे. दुसऱ्या लाटेचा उच्चांक जेव्हा मुंबईत होता तेव्हा मुंबईत 12 ते 15 हजार रूग्णसंख्या होती. आता तो उच्चाकांचाही आकडाही ओलांडला गेला आहे. मुंबईत दिवसभरात 2837 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत दिवसभरात 4 रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.

मुंबईत 5998 बेड्सवर रूग्ण आहेत. तर 35594 बेड रिकामे आहेत. मुंबईतल्या एकूण उपलब्ध बेड्सपैकी 16 टक्के बेड्स भरले आहेत. मुंबईत आत्तापर्यंत 7 लाख 55 हजार 563 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट 88 टक्के झाला आहे. मुंबईचा डबलिंग रेट 77 दिवसांवर आला आहे. मुंबईल्या झोपडपट्टी आणि चाळ भागातल्या कंटेन्मेंट झोनची संख्या 32 झाली आहे तर 502 इमारती सील करण्यात आल्या आहेत. मुंबईत आज 67 हजार 487 चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर आत्तापर्यंत मुंबईत 1 कोटी 39 लाख 92 हजार 95 चाचण्या करण्यात आल्या आहेत.

कोरोना रूग्णसंख्या
कोरोना रूग्णसंख्या प्रातिनिधिक फोटो

मुंबईत आज ज्या चार मृत्यूंची नोंद झाली आहे त्यातला एक रूग्ण पुरूष तर तीन रूग्ण महिला होत्या. हे चारही रूग्ण 60 वर्षे वयाच्या वरचे आहेत. मुंबईत आत्तापर्यंत एकूण 16 हजार 388 रूग्णांचा मृत्यू झाले आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीये. महाराष्ट्रात दिवसभरात 36 हजार 265 नवे रूग्ण आढळले आहेत. तर मृत्यूदर 2.8 टक्के इतका नोंदवला गेला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रूग्णवाढीचा आलेख हा चढताच आहे ज्यामुळे महाराष्ट्राच्या चिंतेत भर पडली आहे. राज्यात आज दिवसभरात 8907 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत राज्यात एकूण 65 लाख 33 हजार 154 रूग्ण बरे झाले आहेत.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 99 लाख 47 हजार 436 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 67 लाख 93 हजार 297 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 85 हजार 758 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर 1368 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

Covid 19 : मुंबईत दिवसभरात दुसऱ्या लाटेच्या उच्चांकापेक्षाही सर्वाधिक 20181 रूग्णांची नोंद
ओमिक्रॉन बाधितांची संख्या फेब्रुवारीत पोहोचणार उच्चांकांवर; आयआयटीतील प्राध्यापकाचा दावा

महाराष्ट्रात दिवसभरात 79 नवे ओमिक्रॉन संसर्ग असणारे रूग्ण आढळले आहेत. हे सर्व अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिले आहेत.

कुठे आहेत ओमिक्रॉनचे 57 रूग्ण?

मुंबई-57

ठाणे मनपा-7

नागपूर-6

पुणे मनपा-5

पुणे ग्रामीण-3

पिंपरी चिंचवड-1

एकूण-79

महाराष्ट्रात ओमिक्रॉनच्या रूग्णांची एकूण संख्या 876 इतकी झाली आहे. यातले 565 रूग्ण हे एकट्या मुंबईत आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in