26/11: 'त्या' नराधम दहशतवाद्यांचं फोनवरील 'ते' संभाषण जसंच्या तसं!

26/11 Mumbai Attack: 26/11 मुंबईवरील हल्ल्यात पाकिस्तानमध्ये बसलेल्या दहशतवादी नियंत्रकांच्या सांगण्यावरुन कशाप्रकारे नरसंहार केला.. त्यांच्यात नेमकं काय संभाषण झालं हे सारं काही जाणून घ्या सविस्तरपणे
26/11: 'त्या' नराधम दहशतवाद्यांचं फोनवरील 'ते' संभाषण जसंच्या तसं!
26-11 mumbai attack terrorist phone conversation with pakistani facilitators(फाइल फोटो)

मुंबई: 26 नोव्हेंबर 2008 म्हणजेच 26/11... वेळ रात्री 9.40.. याच वेळी मुंबईत एकाच ठिकाणी सुरु झालं होतं मृत्यूचं तांडव... कारण शेजारील देशाचे 10 नराधम तुमच्या-आमच्यासारख्या निरपराध लोकांवर झाडत होते गोळ्या.. करत होते अमानुषपणे कत्तल.

26/11 हा दहशतवादी हल्ला आजही कोणीच विसरु शकत नाही. अत्यंत घाणेरडे मनसुबे रचून मुंबईवर केलेला हा हल्ला एक प्रकारचं युद्धच होतं. आजही तो क्षण आठवला तरी अनेक कठू आठवणी उफाळून येतात. या सगळ्याला जबाबदार होते दूर पाकिस्तानात बसलेले मानवतेचे शत्रू आणि राक्षसी वृत्तीचे कट्टर दहशतवादी. त्यांच्याच इशाऱ्यावर मुंबईत 26/11 ला नरसंहार घडला.

दरम्यान यावेळी हे राक्षस मुंबईत दहशतवाद्यांना कशाप्रकारे नियंत्रित करत होते आणि हल्ल्याची भीषणता कशी वाढवता येईल हेच पाहत होते. दहशतवादी आणि त्यांचे सो कॉल्ड आका.. यांच्यात त्या रात्री जे काही संभाषण झालं तेच आम्ही आपल्याला सांगणार आहोत. कशाप्रकारे या नराधमांनी तब्बल 60 तासांहून अधिक वेळ संपूर्ण मुंबईला वेठीस धरलं होतं हे जाणून घेऊयात सविस्तरपणे.

मुंबईवरील हल्ल्यादरम्यान दहशतवादी आणि त्यांचे पाकिस्तानातील नियंत्रक यांच्यात नेमकं काय-काय संभाषण झालं होतं. हे सविस्तरपणे देण्यात आलं आहे. त्याचाच काही अंश आम्ही इथे मांडत आहोत. एटीएस मुंबईने हे संभाषण त्यावेळी टॅप केलं होतं. जे नंतर मीडियाच्या देखील हाती लागलं होतं. याबाबत पत्रकार आणि लेखिक हरिंदर बावेजा यांनी देखील आपल्या एका पुस्तकात उल्लेख केला आहे.

(ताज हॉटेल - वेळ मध्यरात्री 1 वाजता)

 • दहशतवादी: हॅलो

 • नियंत्रक: टीव्ही चॅनल सांगत आहेत की, तुम्ही रुम नंबर 360 किंवा 361 मध्ये आहेत. त्यांना कसं कळलं हे? तुमच्य रुममध्ये कॅमेरा आहे का पाहा. तुमच्या रुममधील लाइट बंद करा आधी. कॅमेरा असेल रुममध्ये तर गोळ्या मारा त्यावर. तुम्ही कुठे आहात तुमची पोझिशन काय.. किती जण आहात हे कोणाला कळता कामा नये. नाहीतर आपला संपूर्ण प्लॅन फिस्कटून जाईल.

 • दहशतवादी: हे कसं कळलं ते काही माहित नाही. कॅमेरा इथे काही दिसत नाही मला.

 • नियंत्रक: कॅमेरा दिसत नाही तुला?

 • दहशतवादी: इकडे खूप लाइट आणि बटणं आहे त्यामुळे काहीही समजतं नाही.

 • नियंत्रक: राहू दे.. आता तुमच्या रुमला आग लावा.. (फोन कट)

(वेळ मध्यरात्री 1.25 वाजता)

 • नियंत्रक: आग लावली की नाही?

 • दहशतवादी: नाही लावली अजून.. आम्ही पडदे गोळा करतोय. दोघ गेले आहेत गोळा करायला त्यांची वाट पाहतोय

 • नियंत्रक: ते कुठे गेले आहेत.

 • दहशतवादी: ते दुसऱ्या रुममध्ये गेले आहेत. खाली काही तरी कारवाई सुरु आहे.

 • नियंत्रक: कोणी गोळीबार करतंय का?

 • दहशतवादी: होय..

 • नियंत्रक: खोलीला आग लावा आणि तुमचं ठिकाण बदला. सतत रुम बदलत राहा.

(फाइल फोटो)

(वेळ मध्यरात्री 2 वाजता)

 • नियंत्रक: सगळं शहर दहशतीखाली आहे. तुम्ही काळजी करु नका.. अल्ला तुमच्या पाठिशी आहे. एक पोलीस आयुक्त आणि एटीएसचा प्रमुखा ठार झालाय असं मीडियावाले सांगतायेत.

 • दहशतवादी: मस्तच..

 • नियंत्रक: आता घाबरण्याचं काही कारण नाही.

(ओबेरॉय हॉटेल- पहाटे 4 वाजता)

 • दहशतवादी: आम्ही अठराव्या मजल्यावर आहोत. आमच्याकडे पाच जण ओलीस आहेत.

 • नियंत्रक: मीडिया सगळं काही कव्हर करत आहे. जास्तीत जास्त नुकसान पोहचवा. लढा... पण जिवंत पकडले जाऊ नका. जे ओलीस आहेत त्यापैकी दोघे जण मुस्लीम आहेत त्यांना सोडून द्या बाकी तिघांना मारुन टाका.

 • दहशतवादी: आमच्याकडे तीनही परदेशी आहेत. ते सिंगापूर आणि चीनचे आहेत.

 • नियंत्रक: ठार करा त्यांना

(नरिमन हाऊस - 27 नोव्हेंबर वेळ दुपारी 12 वाजता)

 • नियंत्रक: ओलिसाला फोन द्या

 • ओलीस असलेली स्त्री: कोण बोलतंय?

 • नियंत्रक: तू तुझ्या दूतावासाशी बोललीस का?

 • ओलीस असलेली स्त्री: मी दूतावासाशी बोलतेय.. ते कॉल करताहेत..

 • नियंत्रक: फोन केला की नाही अद्याप?

 • ओलीस असलेली स्त्री: हो... त्यांना सांगितलं आहे की, फोन लाइन चालू ठेवा.. ते तुमच्याशी संपर्क साधतील.

 • नियंत्रक: आता काळजी करु नको मग.. आरामात बस आमच्या माणसाला फोन दे

(नरिमन हाऊस - 28 नोव्हेंबर वेळ सकाळी 7.23 वाजता)

 • दहशतवादी: मला वाटतं त्यांची टीम आता खाली येत आहे.

 • नियंत्रक: आता तुमच्या टेरेसवर पंधरा जण हेलिकॉप्टरमधून खाली उतरले आहेत.

 • दहशतवादी: समोरच्या इमारतीत पण काही कमांडो बसलेले आहेत

 • नियंत्रक: गोळ्या झाड... गोळयांचा खच पाड.. पण रुमच्या बाहेर पडायचं नाही. एक काम करा.. टेरेसवर जा आणि त्यांच्या दिशेने बॉम्ब फेका.. त्यांनी गोळीबार करण्याआधी तुम्हीच गोळीबार करा.. अल्लाचे नाव घ्या आणि या कामाला सुरुवात करा.

 • दहशतवादी: मी जखमी झालोय

 • नियंत्रक: अल्ला तुझे रक्षण करो..

 • दहशतवादी: त्यांचे लोकंही जखमी होत आहेत.

 • (याच क्षणी प्रचंड मोठा स्फोट होतो आणि दहशतवाद्याचा फोनवरील आवाजही बंद होतो)

दहशतवादी आणि त्यांचे पाकिस्तानातील नियंत्रक यांच्यातील अनेक संवाद हे त्यावेळी मुंबई पोलिसांच्या हाती लागले होते. जामधील काही भाग आम्ही आपल्यासमोर आणला आहे.

26-11 mumbai attack terrorist phone conversation with pakistani facilitators
26/11 : ज्या दिवशी मुंबईने पाहिला दहशतवादाचा कहर आणि मृत्यूचं तांडव

26/11 हा दिवस भारतीय नागरिक कधीही विसरु शकत नाही. पण याचा अर्थ भारत कमकुवत आहे असा कधीही कुणीही करुन घेऊ नये. भारत हा आपल्या शत्रूंना निधड्या छातीने तोंड देण्यास नेहमीच सज्ज असतो. पण भ्याडपणे बायका-मुलांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना उत्तर देण्यास आमचे काहीशे जवानच पुरेसे.. अशा या जवानांना मुंबई Tak कडून पुन्हा एकदा मानचा मुजरा!

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in