3 अतिरेक्यांना कंठस्नान, काश्मिरी पंडीत राहुल भटची हत्या करणाऱ्या दोघांचाही खात्मा

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणाच्या सर्च ऑपरेशनला मोठं यश
3 अतिरेक्यांना कंठस्नान, काश्मिरी पंडीत राहुल भटची हत्या करणाऱ्या दोघांचाही खात्मा
काश्मिरी पंडीत राहुल भटची हत्या करणाऱ्या दोन अतिरेक्यांना ठार मारण्यात आलं आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये तीन अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलं आहे. बांदीपोरा भागातील ब्रार अरगाम भागात झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन अतिरेक्यांपैकी दोन अतिरेकी हे काश्मिरी पंडीत राहुल भटचे मारेकरी होते.

बुधवारी सुरक्षा यंत्रणा आणि अतिरेक्यांमध्ये चकमक उडाली. ज्यात एका अतिरेक्याला मारण्यात पोलिसांना यश आलं. यावेळी दोन अतिरेकी पसार होण्यात यशस्वी झाले. जम्मू-काश्मीर पोलिसांच्या IG नी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी झालेले दोन अतिरेकी शुक्रवारच्या चकमकीत पोलिसांच्या तावडीत सापडले.

अखेरीस लष्कर-ए-तोयबाच्या अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात पोलीस यंत्रणेला यश आल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. काही दिवसांपूर्वीच अतिरेक्यांनी राहुल भट या काश्मिरी पंडीताची हत्या केली होती. महसूल विभागाचा कर्मचारी असलेल्या राहुलची बडगाम जिल्ह्यातील तहसील कार्यालयात घुसून हत्या करण्यात आली होती.

काश्मिरी पंडीत राहुल भटची हत्या करणाऱ्या दोन अतिरेक्यांना ठार मारण्यात आलं आहे.
हनुमान चालीसा, लाऊडस्पीकर लावून काश्मिरी पंडीतांची समस्या दूर होणार नाही - संजय राऊत

या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणांनी मोठी शोधमोहीम हातात घेतली होती. काश्मीर टायगर्स या अतिरेकी गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली होती. राहुल भटच्या हत्येनंतर काश्मिरी पंडीत समुदायातील लोकांनी काश्मीरमध्ये जोरदार निदर्शन केली.

Related Stories

No stories found.