Covid 19 : महाराष्ट्रात 46 हजार 406 नव्या कोरोना रूग्णांची नोंद, 36 मृत्यू

Covid 19 : महाराष्ट्रात 46 हजार 406 नव्या कोरोना रूग्णांची नोंद, 36 मृत्यू
कोरोना रुग्णसंख्याप्रातिनिधिक फोटो

महाराष्ट्रात दिवसभरात 46 हजार 406 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 36 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यू दर 2 टक्के झाला आहे. आज दिवसभरात 34 हजार 658 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत 66 लाख 83 हजार 769 कोरोना बाधित रूग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.39 टक्के झाले आहे.

 कोरोना रुग्णसंख्या
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सगळ्या राज्यांतील कोरोना स्थितीचा आढावा, महाराष्ट्राने काय केल्या मागण्या?

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 7 कोटी 13 लाख 59 हजार 539 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 70 लाख 81 हजार 67 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 17 लाख 95 हजार 621 व्यक्ती होमक्वारंटाईन आहे तर 9124 व्यक्ती होमक्वारंटाईन आहेत. आज राज्यात ओमिक्रॉनचा एकही रूग्ण आढळून आलेला नाही ही बाब दिलासादायक आहे.

आजपर्यंत राज्यात ओमिक्रॉनच्या 1367 रूग्णांची नोंद झाली आहे.

आज घडीला राज्यात 2 लाख 51 हजार 828 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात 46 हजार 406 रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 70 लाख 81 हजार 67 इतकी झाली आहे.

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या (फाइल फोटो, सौजन्य - PTI)

मुंबईत दिलासा

मुंबईसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मुंबईत आज पॉझिटिव्ह रूग्णांपेक्षा डिस्चार्ज मिळालेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे. मुंबईत दिवसभरात 13 हजार 702 रूग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. तर 20 हजार 849 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट 88 टक्के झाला आहे. तर डबलिंग रेट 36 दिवसांवर गेला आहे.

 कोरोना रुग्णसंख्या
लहान मुलांसाठी डेल्टापेक्षा जास्त घातक ठरू शकतो ओमिक्रॉन, काय म्हणत आहेत तज्ज्ञ?

मुंबईचा 6 जानेवारी ते 12 जानेवारी या आठवड्यातला रूग्णवाढीचा दर 1.85 टक्के इतका नोंदवला गेला आहे. मुंबईत आज दिवसभरात पाच रूग्णांची नोंद झाली आहे. या पाच रूग्णांपैकी 1 रूग्ण महिला होती तर पाच रूग्ण पुरूष होते. या सगळ्या रूग्णांचं वय 60 वर्षे आणि त्यावरच्या वयाचे होते. मुंबईत आत्तापर्यंत एकूण 16426 मृत्यू झाले आहेत. आज दिवसभरात मुंबईत 63 हजार 31 चाचण्या झाल्या, त्यापैकी 13 हजार 702 चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.

13 हजार 702 रूग्ण पॉझिटिव्ह आले असून त्यापैकी 871 रूग्णांना रूग्णालयात दाखल कऱम्यात आलं आहे. मुंबईल्या विविध रूग्णालयं आणि कोव्हिड सेंटरमध्ये जे बेड आहेत ते आज घडीला 17.3 टक्के भरले आहेत. मुंबईतल्या झोपडपट्टी आणि चाळी यामधल्या कंटेन्मेंट झोनची संख्या 0 झाली आहे. तर 61 इमारती सील करण्यात आल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in