Corona virus : अर्धा भारत वापरत नाही Mask, केंद्र सरकारने दिली माहिती

जाणून घ्या काय म्हटलं आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने?
Corona virus : अर्धा भारत वापरत नाही Mask,  केंद्र सरकारने दिली माहिती

कोरोनाची दुसरी लाट किती भयंकर आहे हे आपण अनुभवतो आहोतच. दुसऱ्या लाटेत अनेकांचे मृत्यू झाले आहेत तसंच कोरोनाचा कहरही चांगलाच वाढलेला पाहण्यास मिळाला. कोरोनाची दुसरी लाट इतकी भयंकर आहे की यापेक्षा पहिली लाट परवडली असं म्हणायची वेळ आपल्यावर आली आहे. पहिल्या लाटेत आपल्या हाताशी लस नव्हती. या लाटेत आपल्या हाताशी लस आणि लसीकरण मोहीम आहे मात्र लसींचं उत्पादन कमी झाल्याने आणि केंद्र सरकारकडून पुरेसा पुरवठा न झाल्याने लसीकरण मोहिमेचा वेगही मंदावला आहे. अशात मास्क लावणं, सोशल डिस्टन्सिंग आणि हात धुणे ही त्रिसूत्री पाळण्याचं आवाहन हे वारंवार केलं जातं आहे. पहिल्या लाटेतही ही त्रिसूत्री होतीच. अशात आता अर्धा भारत म्हणजेच भारतातले 50 टक्के लोक मास्क वापरतच नाहीत अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

Corona virus : अर्धा भारत वापरत नाही Mask,  केंद्र सरकारने दिली माहिती
Double Mask: आता वेळ आली डबल मास्क घालण्याची, 'या' गोष्टी लक्षात ठेवा; नाहीतर...
Double Mask
Double Mask(फाइल फोटो- India Today)

काय म्हटलं आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ?

केंद्र सरकारने एका सर्वेक्षण अहवालाचा हवाला देऊन केंद्र सरकारने जी संख्या दिली आहे त्यानुसार अर्धा भारत मास्क वापरत नाही. म्हणजेच देशातली 50 टक्के जनता मास्क हा सर्वात मोठा सुरक्षा रक्षक असलेला महत्त्वाचा घटक वापरत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा केंद्रीय आरोग्य प्रशासनाकडून कोरोना विरोधी लढ्यामध्ये मास्क वापरणं हे अत्यंत आवश्यक असल्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

जे 50 टक्के लोक मास्क वापरतात त्यांच्याबाबत काय म्हटलं आहे या अहवालात?

भारतात जे उर्वरित लोक मास्क वापर करतात त्यापैकी 64 टक्के लोक तोंडावर मास्क लावतात मात्र नाक झाकत नाहीत.

20 टक्के लोक त्यांच्या हनुवटीवर मास्क लावतात

2 टक्के लोक त्यांच्या मानेवर मास्क वापरतात

14 टक्के लोक अत्यंत व्यवस्थित पणे तोंड आणि नाक झाकेल असा मास्क वापरतात असं या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे.

Corona virus : अर्धा भारत वापरत नाही Mask,  केंद्र सरकारने दिली माहिती
मुंबईत विना मास्क फिरणाऱ्यांकडून २ एप्रिलपर्यंत सुमारे ५० कोटींची दंड वसुली

देशातले 50 टक्के लोक मास्क लावतात त्यांच्या मास्क लावण्याच्या विविध तऱ्हा आहेत. फक्त 14 टक्के लोक हे व्यवस्थित मास्क लावतात. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनासंदर्भात भारतातील योग्य ती माहिती देण्यासाठी सुरू केलेल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही आकडेवारी पोस्ट करण्यात आली आहे. पोस्टमध्ये दावा केल्याप्रमाणे १० एप्रिल रोजीनुसार ही आकडेवारी तयार करण्यात आली असून देशभरातल्या २५ शहरांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आलं होतं. त्यापैकी नमुना पद्धतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.

कोरोनाचं संकट गहीरं झाल्यापासून मास्क वापरणं हे अत्यंत आवश्यक असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र एप्रिल महिन्यात झालेल्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे. मास्क लावणं हे आपल्याला कदाचित 2022 मध्येही कायम ठेवावं लागेल असं काही दिवसांपूर्वी केंद्राच्या ऑक्सिजन टास्क फोर्सचे सदस्य राहुल पंडित यांनीही सांगितलं होतं. अशात आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अर्धा भारत मास्कच लावत नसल्याची माहिती दिली आहे आणि मास्क लावण्याचं आवाहनही केलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in