5G Service : भारतातल्या १३ शहरांमध्ये लवकरच सुरू होणार सेवा, मुंबई-पुण्याचा समावेश

जाणून घ्या आणखी कोणत्या शहरांमध्ये ही सेवा सुरू होणार आहे?
5G Service : भारतातल्या १३ शहरांमध्ये लवकरच सुरू होणार सेवा, मुंबई-पुण्याचा समावेश
5G commercial roll out will first happen in 13 major cities in India

केंद्र सरकारने 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाला मंजुरी दिली आहे. दूरसंचार विभागाने या आठवड्यात लिलावासाठी अर्ज मागवण्यास सुरूवात केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २६ जुलै २०२२ ला 5G स्पेक्ट्रमचा लिलाव होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने ९ स्पेक्ट्रमचा लिलाव करण्याची योजना आखली आहे. हा लिलाव २० वर्षांसाठी असणार आहे. यामध्ये ६००,७००, ८००, १८००, २१००, २३०० तसंच २५०० मेगाहर्ट्झ बँडचा लिलाव होणार आहे.

दूरसंचार विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशभरातल्या १३ शहरांत 5G सेवा उपलब्ध होणार आहे. अहमदाबाद, बंगळुरू, चंदीगढ, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरूग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, लखनऊ, मुंबई आणि पुणे या शहरांचा समावेश आहे.

२०२२ मध्ये 5G सेवा सुरु होऊ शकते, असे भारताच्या दूरसंचार विभागाने याआधी सांगितले होतं. काही महत्वाच्या शहरांमध्ये सर्वात आधी 5G सेवा सुरु करण्यात येणार असल्याचे दूरसंचार विभागाने सांगितले होतं. दरम्यान, भारतामध्ये सध्या अनेक ठिकाणी 4G सेवाही उपलब्ध नाही. पण देशात 5G ची चाचपणी सुरु करण्यात आली आहे.

देशात सर्वात आधी कोणती टेलिकॉम कंपनी व्यावसायिक पद्धतीने 5G सेवा सुरू करणार आहे हे अद्याप ठोसपणे सांगता येणं कठीण आहे. जिओ, एअरटेल, व्होडाफोन-आयडीया यापैकी कोणतीही कंपनी ही सेवा सुरू करणारी पहिली कंपनी असू शकते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १५ ऑगस्टपासून कमर्शिअल पद्धतीने 5G सेवा सुरू होईल असं सांगण्यात आलं होतं. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही योजना सुरू होण्यास सप्टेंबर महिना उजाडू शकतो.

भारत सरकार या वर्षी ऑगस्टपर्यंत स्वदेशी विकसित 5G तंत्रज्ञान लॉन्च करू शकते असे संकेत दूरसंचार राज्यमंत्री देवुसिंह चौहान यांनी या महिन्याच्या सुरुवातीला दिले होते.

UN ची संस्था ITU ने जिनिव्हा येथे आयोजित केलेल्या वर्ल्ड समिट ऑफ इन्फॉर्मेशन सोसायटी २०२२ मध्ये बोलताना त्यांनी ही टिप्पणी केली. दूरसंचार तंत्रज्ञानाच्या विकासासाठी सरकार संशोधन आणि विकास निधी सुरू करत आहे. महत्त्वाचे म्हणजे, IT प्रमुख TCS आणि सरकारी मालकीची दूरसंचार संशोधन संस्था CDoT स्वदेशी 5G तंत्रज्ञान विकसित करण्यात गुंतलेली आहेत अशी माहिती आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in