CM Uddhav Thackeray यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीमंत दगडूशेठ गणपतीला 61 किलोचा मोदक अर्पण

CM Uddhav Thackeray यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीमंत दगडूशेठ गणपतीला 61 किलोचा मोदक अर्पण

राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत. आज पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात शिवसेनेच्या नेत्या आणि उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते 61 किलोचा मोदक अर्पण करून महाआरती देखील करण्यात आली.

यावेळी माजी आमदार रवींद्र मिर्लेकर,पुणे शहर संपर्कप्रमुख बाळा कदम, शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, पुणे महापालिकेतील शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार यांच्यासह आजी माजी नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते.

सर्व मंदिरं लवकरात लवकर उघडी व्हावी : नीलम गोऱ्हे यांची गणरायाकडे प्रार्थना

शिवसेना पुणे शहराच्या वतीने उद्धव ठाकरे यांच्या 61 व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल त्यांना आम्ही शुभेच्छा देतो, आभार मानतो आणि देवाचे अभिनंदन करतो. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण केलेलं आहे. भयंकर अशा करोना रोगापासून ते जगाला, महाराष्ट्राला, पुण्याला, मुंबईला सर्वांना कोरोनापासून मुक्ती मिळावी.

अतिवृष्टीमुळे जे दगावले गेले आहेत. त्यांच्या आत्म्यास शांती मिळावी. सर्व पूरग्रस्तांचे पुनर्वसन व्हावे, या नैसर्गिक आपत्तीमधून सुटका होण्यासाठी जास्तीतजास्त बळ, शक्ती आणि सेवेची संधी उद्धवजी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि आमच्या सरकारला मिळावी. शिवसेनेला सुरक्षित ठेवून, प्रत्येकाला दीर्घ आयुष्य मिळावं आणि सौ. रश्मी वहिनी यांच सौभाग्य आणि भाग्य या दोन्हीमध्ये वृद्धी व्हावी. त्याच बरोबर श्री गणेश देवा सर्व मंदिरं लवकरात लवकर उघडी होण्याच्या दृष्टीने करोनाच्या परिस्थितीमधून आम्हाला मार्ग मिळावा. यासाठी आम्ही हा संकल्प करीत आहोत, अशी प्रार्थना नीलम गोऱ्हे यांनी गणराया चरणी केली.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in