विधान परिषद १२ आमदार नियुक्तीचा पेच : ८ महिने उलटूनही राज्यपालांनी निर्णय घेतला नाही - राज्य सरकार - Mumbai Tak - 8 months on no communication from governor on 12 mlc nomination maharashtra govt to bombay high court - MumbaiTAK
बातम्या

विधान परिषद १२ आमदार नियुक्तीचा पेच : ८ महिने उलटूनही राज्यपालांनी निर्णय घेतला नाही – राज्य सरकार

विधानपरिषदेवरील नामनियुक्त सदस्यांसाठी राज्य सरकारने ६ नोव्हेंबर २०२० रोजी १२ सदस्यांचा नावाची शिफारस केली. परंतू आठ महिने उलटूनही राज्यपालांनी यावर काहीही निर्णय घेतला नाही असं प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात सादर केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी मंत्रीमंडळाशी विचारविनीमय करुनच ही यादी राज्यपालांकडे सादर केल्याचं सरकारने हायकोर्टात स्पष्ट केलं. राज्यपालांनी १२ आमदारांच्या नियुक्तीबद्दल निर्णय न घेऊन कर्तव्याचा […]

विधानपरिषदेवरील नामनियुक्त सदस्यांसाठी राज्य सरकारने ६ नोव्हेंबर २०२० रोजी १२ सदस्यांचा नावाची शिफारस केली. परंतू आठ महिने उलटूनही राज्यपालांनी यावर काहीही निर्णय घेतला नाही असं प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात सादर केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी मंत्रीमंडळाशी विचारविनीमय करुनच ही यादी राज्यपालांकडे सादर केल्याचं सरकारने हायकोर्टात स्पष्ट केलं.

राज्यपालांनी १२ आमदारांच्या नियुक्तीबद्दल निर्णय न घेऊन कर्तव्याचा भंग केल्याचा आरोप नाशिक येथील नागरिक रतन लूथ यांनी केला आहे. लूथ यांनी मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भात याचिकाही दाखल केली आहे. या याचिकेवर उत्तर देत असताना मुख्य न्यायमुर्ती दीपांकर दत्ता आणि गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सरकारी वकीलांनी बाजू मांडली.

नामनियुक्त सदस्य म्हणून कोणाची नेमणूक करावी याबाबत याचिकाकर्त्यांचं काहीही म्हणणं नाही. परंतू याचिकाकर्त्यांची मागणी आहे की याबद्दल निर्णय घेतला जावा. राज्यपाल जरीही कायदेशीर कारवाईच्या कक्षेत येत नसले तरीही त्यांचे निर्णय कायदेशीर कारवाईच्या कक्षेत यायला हवेत असा युक्तीवाद लुथ यांच्या वकीलांनी हायकोर्टात केला.

जनहितासाठी आणि लोकशाहीसाठी राज्यपालांनी याबाबत लवकरात लवकर निर्णय घेणं गरजेचं आहे. दरम्यान हायकोर्टाने या प्रकरणावरील सुनावणी ही १६ जुलैला ठेवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

17 + 20 =

…तर तुम्हाला असू शकतात पोटाचे गंभीर आजार Magic Moments vs Smirnoff Vodka: लोकांच्या आवडत्या Vodka मध्ये ‘हा’ आहे फरक? भारतातील ती 10 शहरे… जिथे आहेत सर्वाधिक अब्जाधीश; मुंबईचा नंबर…? आईचा मृत्यू अन्… 144 किलोच्या महिलेने घटवलं 75 किलो वजन! रश्मिकानंतर आता दुसऱ्या हिरोईनसोबत रणबीरचे ‘ते’ सीन्स! मुलींमधील ‘हे’ विशेष गुण पाहून मुलं होतात आकर्षित… IPL च्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकणारे ‘ते’ 5 खेळाडू कोण? Film पाहण्याची आवड आहे? मग ‘हे’ प्रेरणादायी चित्रपट एकदा बघाच! Belly Fat कमी करण्यासाठी अगदी सिंपल डाएट प्लान! हिवाळ्यात आळस न करता Weight Loss साठी घरीच करा ‘या’ सोप्या गोष्टी! UPSC : चार वेळा अपयश, पण मानली नाही हार; IRS अधिकारी प्रेरणादायी स्टोरी 144 किलोच्या महिलेने घटवलं 75 किलो वजन; खायची फक्त ‘या’ 8 गोष्टी… चाळीशीतही हॉट आणि फीट! अभिनेत्री nimrat kaur च्या फिटनेसचा विषयच नाही Vacation प्लान करताय? मग भारतातच अनुभवा हे विदेशी सौंदर्य! Weight Loss साठी ‘हा’ स्पेशल चहा एकदा पिऊनच पाहा! अंथरुणावर पडल्यावर लगेच झोप येते असेल तर वेळीच सावध व्हा… ही 5 फळे किडनीसाठी असतात फायदेशीर रक्तातील शुगर कधीच वाढणार नाही, फक्त एवढंच करा Vicky Kaushal वर सचिन तेंडुलकर इम्प्रेस; कारण… Alcohol चा रिकाम्या पोटी कसा होतो परिणाम?