
मुंबई: मुंबईत कोरोना रूग्णसंख्येत प्रचंड मोठी वाढ झाली आहे. आज (2 डिसेंबर) दिवसभरात मुंबईत 8063 नवे कोरोना रूग्ण सापडले आहेत. त्यामुळे आता मुंबईत पुन्हा लॉकडाऊन लागू केला जाणार का? असाच सवाल मुंबईकरांना पडला आहे. एकीकडे मुंबईत 8 हजाराहून अधिक रुग्ण सापडलेले असताना आज दिवसभरात फक्त 578 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आता मुंबईकरांची चिंता अधिक वाढली आहे.
या सगळ्यात दिलासादायक बाब म्हणजे आज दिवसभरात एकाही कोरोना रूग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही.
मुंबईत आत्तापर्यंत एकूण 7 लाख 50 हजार 736 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर मुंबईत आत्तापर्यंत एकूण 16 हजार 377 मृत्यू झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 94 टक्के इतका झाला आहे. मुंबईचा डबलिंग रेट कमी होऊन 183 दिवसांवर आला आहे.
मुंबईत सील करण्यात आलेल्या इमारतींची संख्या आता 203 इतकी झाली आहे. तर झोपडपट्टी आणि चाळींमधल्या कंटेन्मेंट झोनची संख्या 09 झाली आहे.
मुंबईत कसे वाढत गेले रूग्ण पाहू
1 जानेवारी - 6347 रुग्णांची नोंद
31 डिसेंबर- 5631 रूग्णांची नोंद
30 डिसेंबर -3671 रूग्णांची नोंद
29 डिसेंबर-2510 रूग्णांची नोंद
28 डिसेंबर - 1377 रूग्णांची नोंद
27 डिसेंबर - 809 रूग्णांची नोंद
26 डिसेंबर - 922 रूग्णांची नोंद
25 डिसेंबर-757 रूग्णांची नोंद
24 डिसेंबर-683 रूग्णांची नोंद
23 डिसेंबर- 602 रूग्णांची नोंद
22 डिसेंबर 490 रूग्णांची नोंद
21 डिसेंबर 327 रूग्णांची नोंद
21 ते 1 जानेवारी या कालावधीत रूग्णसंख्या 327 वरून 8063 वर गेली आहे. तर आज दिवसभरात 8063 रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईत तिसरी लाट आली आहे का? याची चर्चा आता सुरू झाली आहे. त्यामुळे मुंबईत तिसरी लाट आल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. शनिवारच्या तुलनेत आजचे मुंबईतले रूग्ण हे 1716 ने वाढले आहेत. मुंबईसाठी ही नक्कीच चिंतेची बाब मानली जाते आहे. त्यामुळे मुंबईत लवकरच लॉकडाऊन केलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई महापालिकेच्या डी वॉर्डमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की चार ते पाच दिवसात पाच इमारती सील केल्या आहेत. दूतावास अपार्टमेंटची बी विंग आणि नेपेनसी रोड येथील दर्या महलची ए विंग सील करण्यात आलेल्या इमारतींमध्ये आहेत. दूतावास अपार्टमेंटमध्ये गेल्या तीन दिवसांत 13 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्यापैकी 11 प्रकरणे बी विंगमधून आणि उर्वरित ए विंगमधून नोंदवली गेली आहेत. व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी इमारती सील केल्या जात आहेत. मंगळवारी दूतावास अपार्टमेंटमध्ये 5 जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली होती, त्यानंतर संपूर्ण इमारतीत चाचणी घेण्यात आली आणि आणखी 8 जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली.