Corona : काळजीत भर! मुंबईत 8082 नव्या रूग्णांची नोंद, दिवसभरात दोन मृत्यू

मुंबईचा डबलिंग रेट 138 दिवसांवर
Corona : काळजीत भर! मुंबईत 8082 नव्या रूग्णांची नोंद, दिवसभरात दोन मृत्यू
देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ

मुंबईत दिवसभरात 8082 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात दोन मृत्यू झाले आहेत. दिवसभरात 622 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत आज घडीला 37 हजार 274 सक्रिय रूग्ण आहेत. तर कोरोनामुळे मुंबईत आत्तापर्यंत 16 हजार 379 मृत्यू झाले आहेत.

आज जे दोन मृत्यू नोंदवले गेले त्यातील एक पुरूष आणि एक महिला आहे. दोघेही 60 वर्षांच्या वरील वयाचे होते तसंच दोन्ही रूग्ण सहव्याधी असलेले होते. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. मुंबईचा रूग्ण बरे होण्याचा दर अर्थात रिकव्हरी रेट 93 टक्के इतका झाला आहे. मुंबईचा डबलिंग रेट 138 दिवसांवर गेला आहे. तर मुंबईचा कोव्हिड ग्रोथ रेट 27 डिसेंबर ते 2 जानेवारी या आठवड्यात 0.50 टक्के इतका झाला आहे.

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ
भाजप नेत्या पंकजा मुंडे दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह, मुंबईतल्या घरी क्वारंटाईन

मुंबईत कसे वाढत गेले रूग्ण पाहू

2 जानेवारी - 8063 रूग्णांची नोंद

1 जानेवारी - 6347 रूग्णांची नोंद

31 डिसेंबर- 5631 रूग्णांची नोंद

30 डिसेंबर- 3671

29 डिसेंबर - 2510 रूग्णांची नोंद

28 डिसेंबर - 1377 रूग्णांची नोंद

27 डिसेंबर - 809 रूग्णांची नोंद

26 डिसेंबर - 922 रूग्णांची नोंद

25 डिसेंबर-757 रूग्णांची नोंद

24 डिसेंबर-683 रूग्णांची नोंद

23 डिसेंबर- 602 रूग्णांची नोंद

22 डिसेंबर 490 रूग्णांची नोंद

21 डिसेंबर 327 रूग्णांची नोंद

21 डिसेंबरला 327 रूग्ण मुंबईत होते मात्र आता ती संख्या 8 हजारांच्या वर गेली आहे. मुंबईसाठी ही नक्कीच चिंतेची आणि काळजीची बाब आहे. मुंबईत वाढत्या कोरोना रूग्णांमुळे शाळाही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत सील करण्यात आलेल्या इमारतींची संख्या 318 झाली आहे. तर झोपडपट्टी आणि चाळी या ठिकाणी 11 कंटेन्मेंट झोन आहेत.

कोव्हिड
कोव्हिड प्रातिनिधिक फोटो

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णवाढ हा चिंतेचा विषय ठरु लागला होता. त्या पार्श्वभूमीवर 4 जानेवारी ते 31 जानेवारी या कालावधीत पहिली ते नववी आणि अकरावीच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णवाढ असताना मुलांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं सांगितलं जातंय. पहिली ते आठवीच्या शाळा नुकत्याच सुरु झाल्या होत्या.

मात्र पुन्हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी शाळांबाबत अखेर निर्णय घेतलाय. ऑफलाईन शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शाळा या सुरु राहणार आहेत. मात्र शाळांचे ऑफलाईनवर्ग बंद राहणार आहेत.

सद्यस्थितीत जगातील काही देशांमध्ये आणि मुंबई महापालिका क्षेत्रात ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या विषाणूची भर पडली आहे. मुंबईची एकूण लोकसंख्या त्याचप्रमाणे शहरात जगभरातून लोक येत असतात आणि जात असतात. त्यामुळे नव्या व्हेरिएंटचा प्रभाव होऊ नये यासाठी मुंबई महापालिका क्षेत्रातील पहिली ते नववी आणि अकरावी यांच्या शाळा 4 जानेवारी ते 31 जानेवारी या कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहेत असं महापालिकेने म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in