Covid 19 : आज महाराष्ट्रात 825 नव्या रूग्णांचं निदान, 14 मृत्यूंची नोंद

कोरोना रुग्ण तपासणी
कोरोना रुग्ण तपासणी फोटो-इंडिया टुडे

महाराष्ट्रात आज दिवसभरात 825 नव्या रूग्णांचं निदान झालं आहे. तर 14 मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्राचा मृत्यू दर 2.12 टक्के इतका झाला आहे. हा मृत्यूदर गेल्या काही दिवसांपासून इतकाच आहे. आज महाराष्ट्रात 792 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत 64 लाख 98 हजार 807 कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.71 टक्के इतका झाला आहे.

कोरोना रुग्ण तपासणी
omicron symptoms : भारतातील 'ओमिक्रॉन'च्या रुग्णांमध्ये कोणती लक्षणं आढळली?

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 78 लाख 83 हजार 61 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 50 हजार 965 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 73 हजार 53 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 864 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 7 हजार 111 सक्रिय रूग्ण आहेत. आज महाराष्ट्रात 825 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रूग्णांची एकूण संख्या 66 लाख 50 हजार 965 झाली आहे.

महाराष्ट्रात ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे आणखी 11 रूग्ण आढळले आहेत. यापैकी 8 रूग्ण मुंबई विमानतळावरील तपासणीमध्ये तर एक रूग्ण पिंपरी चिंचवड, एक रूग्ण उस्मानाबाद आणि एक रूग्ण नवी मुंबईत आढळला आहे. नवी मुंबईत ओमिक्रॉनचा शिरकाव होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

ओमिक्रॉन व्हेरिएंटचे 65 रूग्ण कुठे कुठे आहेत?

मुंबई - 30

पिंपरी-12

पुणे ग्रामीण- 7

पुणे महापालिका-3

सातारा- 3

उस्मानाबाद- 3

कल्याण डोंबिवली- 2

बुलढाणा-1

नागपूर-1

लातूर-1

वसई विरार-1

नवी मुंबई -1

एकूण-65

यापैकी 34 रूग्णांना त्यांची RTPCR चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर घरी सोडण्यात आलं आहे.

(प्रातिनिधिक फोटो)

आज आढळलेल्या 11 ओमिक्रॉन रूग्णांची माहिती-

11 पैकी 8 रूग्ण मुंबईत आढळले. हे रूग्ण विमानतळावरील सर्वेक्षणात आढळले आहेत. यातील प्रत्येकी एक रूग्ण अनुक्रमे केरळ, गुजरात आणि ठाणे येथील आहे. तर इतर पाच रूग्ण मुंबईतले आहेत. या आठ जणांमध्ये 18 वर्षांखालील दोन मुलांचा समावेश आहे. युगांडा मार्गे दुबई असा प्रवास केलेले आणि मुंबईत पोहचलेले दोन जण आहेत. तर इंग्लंडहून मुंबईला आलेले चार जण आहेत. दुबईहून मुंबईत आलेले दोन जण आहेत. हे सर्व रूग्ण लक्षणेविरहीत ते सौम्य गटातले आहेत.

उस्मानाबाद या ठिकाणी आधी ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या एका रूग्णाच्या शेजारची 13 वर्षांची मुलगी ओमिक्रॉन बाधित आढळली आहे. तिला कोणतीही लक्षणं नाहीत.

केनियाहून हैदराबाद मार्गे आलेला नवी मुंबईतील एक रूग्ण ओमिक्रॉन बाधित आहे. हा 19 वर्षांचा तरूण आहे, त्याने लसीचे दोन डोस घेतले आहेत. मात्र कोरोनाची कोणतीही लक्षणं त्याला नाहीत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in