87 वर्षीय वृद्ध महिलेवर 30 वर्षीय तरुणाने केला बलात्कार, CCTV मुळे सापडला आरोपी

Rape Case: राजधानी दिल्लीत 87 वर्षीय महिलेवर एका 30 वर्षीय तरुणाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पण यावेळी अवघ्या 16 तासात आरोपीला सीसीटीव्ही फुटेजमुळे अटक करण्यात पोलिसांना यश आलं.
87 year old woman raped 30 year old sweeper arrested cctv footage identified delhi crime
87 year old woman raped 30 year old sweeper arrested cctv footage identified delhi crime(प्रातिनिधिक फोटो)

मुंबई: देशाची राजधानी दिल्लीत एका 87 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 30 वर्षीय सफाई कामगाराला अटक केली आहे. आरोपीची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. पोलिसांनी आरोपीकडून मोबाइलही जप्त केला आहे जो त्याने वृद्ध महिलेकडून हिसकावून नेला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दिल्लीतील टिळक नगर भागातील आहे. आरोपी अंकित हा या भागात सफाई कामगार म्हणून काम करतो. तो येथील अनेक घरांमध्ये काम करत होता. ही घटना 13 फेब्रुवारी रोजी घडली होती.

सुरुवातीला गॅस शेगडी ठीक करण्याच्या नावाखाली कोणीतरी घरात घुसून वृद्ध महिलेचा मोबाइल घेऊन पळून गेल्याची तक्रार टिळक नगर पोलिसांना फोनवरुन देण्यात आली होती. त्यामुळे पोलीस देखील तात्काळ घटनास्थळी पोहोचले.

या घटनेबाबत पोलिसांनी अशी महिती दिली की, एक 87 वर्षीय महिला ही घरात एकटीच होती. कारण तिची 65 वर्षीय मुलगी आपलं रात्रीचं जेवण आटोपून घराजवळील उद्यानात फिरायला गेली होती. 87 वृद्ध महिला ही गेल्या 7 महिन्यांपासून अंथरुणावर आहे. त्यामुळे त्यांची मुलगीच त्यांची काळजी घेत होती. सुरुवातीला पोलिसांना फक्त मोबाइल चोरी झाली असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे 13 फेब्रुवारीला फक्त मोबाइल चोरीची तक्रार दाखल झाली होती.

पण या घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 14 फेब्रुवारीला पुन्हा एक तक्रार दाखल करण्यात आली. ज्यामध्ये वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यात आलं असल्याचं या तक्रारीत म्हटलं आहे. यानंतर पोलिसांनी आधीच्याच एफआयआरमध्ये नवीन कलमे जोडली. 87 वर्षीय महिलेसोबत झालेल्या लैंगिक अत्याचाराची बातमी ऐकून सर्वांनाच धक्का बसला.

87 year old woman raped 30 year old sweeper arrested cctv footage identified delhi crime
अमरावती : म्हातारचळ पडला महागात, ७० वर्षाच्या महिलेवर अतिप्रसंग करणाऱ्या वृद्धाला अटक

त्यामुळे तत्काळ घटनास्थळी दिल्ली पोलिसांचे उच्चपदस्थ अधिकारी आणि दिल्ली महिला आयोगाचे कर्मचारीही पोहोचले. यावेळी डॉक्टरांच्या पथकालाही पाचारण करण्यात आले.

दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे की, सुरुवातीला या प्रकरणी कोणतीही माहिती किंवा पुरावा पोलिसांना मिळत नव्हता. पण दिल्ली पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी अनेक पथके तयार केली. यावेळी आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी परिसरातील अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातच संबंधित आरोपी पोलिसांना आढळून आला. त्यामुळे आरोपीची ओळख पटल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या पथकाने 16 तासांच्या आत आरोपी अंकित याला अटक केली.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in