Nana Patole यांची स्वपक्षातूनच मोठी कोंडी? काँग्रेसमधील खदखद वाढली

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Nana Patole | Congress news :

मुंबई : काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांची स्वपक्षातूनच कोंडी करण्यात येत असल्याचं चित्र आहे. सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांच्या एबी फॉर्म प्रकरणावरुन हे चित्र अधिक गडद झाल्याचं दिसत आहे. काँग्रेसमधील मोठा गट पटोले यांच्याविरोधात उभा राहिल्यानं अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. यात माजी आमदार आशिष देशमुख यांच्यापासून निलंबित सत्यजीत तांबे, काँग्रेसचे बडे नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवर, सुनील केदार यांची नावं घेता येतील. (A large group from congress stand against state president Nana Patole)

आशिष देशमुख यांचं काँग्रेस अध्यक्षांना पत्र :

नाना पटोले यांच्या कार्यशैलीवर आक्षेप घेत काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी थेट काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना पत्र लिहिलं होतं. यात त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं होतं. त्यानंतर सोमवार (६ फेब्रुवारी) यादिवशीही देशमुख यांनी प्रदेशाध्यक्ष हटविण्याची मागणी केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आशिष देशमुख यांनी पत्रात म्हंटलं होत की,

डिसेंबर २०२१ मधील विधान परिषदेसाठी नागपूरच्या जागेवरून कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून रवींद्र भोयर यांच्या नावाची चर्चा होती. पण मतदानाच्या काही तास आधी नाट्यमय घडामोडी झाल्या, अचानक अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना उमेदवारी दिली, मात्र ते पराभूत झाले.

ADVERTISEMENT

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची मत फुटली. परिणामी पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हांडोरे हेच पराभूत झाले. त्यानंतर शिंदे सरकारच्या बहुमत चाचणीला काँग्रेसचे १० आमदार गैरहजर राहिले. यामुळे सरकारचे बहुमत मोठ्या प्रमाणात वाढले.

ADVERTISEMENT

पक्षादेश असतांनासुद्धा अनेकांनी पक्ष विरोधी काम केलं. या तीनही प्रकरणांची चौकशी करण्याचं आश्वासन नाना पटोले यांनी दिले होते, त्यासाठी हायकमांडकडे अहवाल पाठवणार असल्याचे दावे त्यांनी केले. पण आजपर्यंत कोणावरही कारवाई झाली नाही किंवा कोणालाही जबाबदार ठरविण्यात आले नाही.

राज्यात पक्ष पहिल्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. शिंदे गटामुळे पक्ष पाचव्या क्रमांकावरही जाईल. पक्षात शिस्त नाही. मुळात पक्षाच्या विचारधारेवरही नेत्यांच्या मनात आदर नाही. सर्व बाजूंनी कॉंग्रेस सपशेल तोंडघाशी पडली आहे. सत्ता गेल्यानंतरसुद्धा महाविकास आघाडी एकसंघ आहे, हे चित्र खोटे ठरले आहे. 

Congress : बड्या नेत्याचा दिल्लीत लेटर बॉम्ब; नाना पटोलेंची खुर्ची धोक्यात?

सत्यजीत तांबेंचे आरोप :

सत्यजीत तांबे यांनीही पटोले यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. एबी फॉर्मबाबत प्रदेशाध्यक्षांनी इतका गहाळपणा केला? असा सवाल विचारतं त्यांनी पटोलेंवर जाहीर टीका केली होती. तसंच आमच्या परिवाराला बदनाम करण्यासाठी हेतू पुरस्सर, जाणीवपूर्वक षडयंत्र रचलं गेलं. त्याची स्क्रिप्ट तयार होती, असेही अनेक आरोप त्यांनी केले होते.

सत्यजित तांबेंचा खळबळजनक गौप्यस्फोट! नाना पटोलेंचं प्रदेशाध्यपद धोक्यात?

विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य :

सत्यजीत तांबे यांच्या आरोपांनंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवर आणि सुनील केदार यांनीही एकत्रित पत्रकार परिषद घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र त्यांनी ती पुढे ढकलली. पण यावरुन वडेट्टीवर यांनी भाष्य केलं होतं. काँग्रेसला आता चांगले दिवस येत आहेत. राहुल गांधी संघर्ष करत आहेत. सत्यजीत तांबे यांच्या आरोपांवर प्रदेशाध्यक्षांनी खुलासा करणं गरजेचं आहे, असं ते म्हणाले होते. जर काही चुकीच घडलं असेल तर त्याची दखल हायकमांड घेईल असं म्हणतं त्यांनी खळबळ उडवून दिली होती.

“Nana Patole यांच्यासोबत काम करणं अवघडं”; बाळासाहेब थोरांतांचा लेटरबॉम्ब

बाळासाहेब थोरात यांचं पत्र :

बाळासाहेब थोरात यांनीही मल्लिकार्जून खर्गे यांना पत्र लिहून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची तक्रार केली आहे. बाळासाहेब थोरात यांच्या पत्रात प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसोबत काम करणं अवघडं असल्याचं स्पष्ट केलं आहे. विधान परिषद निवडणुकीदरम्यान झालेलं राजकारण व्यथित करणारं होतं. संगमनेरमधील कार्यकर्त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न होत आहे. तसंच परिस्थिती अशीच राहिली तर काँग्रेसमध्ये दोन गट होतील, असा इशाराही थोरात यांनी दिला आहे.

काही जण गैरसमज पसरवत आहेत. मला अपमानास्पद वागणूक देण्यात आली. अहमदनगर जिल्ह्यातील कार्यकारिणी माझ्याशी कोणतीही सल्लामसलत न करता बरखास्त केली. पक्ष कुणाच्या घरचा नाही अशी वक्तव्य जाहीरपणे करण्यात आली. प्रकरण मिटवण्याऐवजी ते वाढवण्यात आलं. सार्वजनिकरित्या कुटुंबाविरोधात वक्तव्य करण्यात आली, असाही आरोप थोरात यांनी त्यांच्या पत्रातून केला होता.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT