मुंबईहून लग्नासाठी गावी निघालेली खासगी बस उलटली, भीषण अपघातात २५ जण जखमी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राकेश गुडेकर, रत्नागिरी, प्रतिनिधी

मुंबई परळ येथून केळणे गोमळेवाडी येथे लग्नकार्यासाठी प्रवासी घेऊन जाणाऱ्या खासगी आराम बसला मुंबई- गोवा महामार्गावर अपघात झाला आहे. महामार्गावरील भरणे नाका परिसरातील रिलायन्स पेट्रोल पंप परिसरात ही खासगी आराम पलटी होऊन झालेल्या अपघातात 25 हून अधिक प्रवाशी जखमी झाले, तर काहीजण गंभीर जखमी आहेत. चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस रस्त्याच्या डाव्या बाजूला पलटी झाली. आज पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. 

घटना स्थळावरून मिळलेल्या माहितीनुसार खेड तालुक्यातील केळणे गोमळेवाडी येथे असलेल्या लग्नकार्यासाठी मुंबईतील परेल येथून नातेवाईक निघाले होते. मध्यरात्री परेल येथून निघालेली खासगी आराम बस महामार्गावरील भरणे नाका परिसरातील रिलायन्स पेट्रोल पंपानजीक पोहचली असता चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस रस्त्याच्या डाव्या बाजूला खड्ड्यात पलटी झाली. भरधाव वेगातील बसला अपघात होताच बसमधील प्रवाशांनी जोरात आरडाओरडा करायला सुरवात केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अपघातादरम्यांन झालेला जोरदार आवाज आणि प्रवाश्यांचा आरओरडा ऐकून ग्रामस्थानी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात बसमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम ग्रामस्थांनी सुरु केले. दरम्यान खेड येथील मदत ग्रुपचे अध्यक्ष प्रसाद गांधी हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशाना मदत ग्रुपच्या रुग्णवाहिकेची तात्काळ कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे रुग्णालय सूत्रांकडून सांगण्यात आले. या अपघाताची खबर लग्नकार्य असलेल्या केळणे गावात कळताच ग्रामस्थांनी रुग्णालयात धाव घेतली. अपघातातील जखमीवर सध्या कळम्बनी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघातग्रस्तची नावे पुढीलप्रमाणे

ADVERTISEMENT

वनिता महेंद्र गोमले-५८

ADVERTISEMENT

अविनाश रामचंद्र गोमले-३१

अल्पेश अरुण गोमले-३४

संदिप तुकाराम गोमले-४५

अनंत सिताराम खेराडे-६७

राजाराम धोंडु गोमले-५२

रविंद्र धोंडु साळुंखे-६१

वैजयंती लक्ष्मण गोमले-५५

विठ्ठल धोंडु बोले-५६

लक्ष्मण महादेव गोमले-६६

ओंकार भगवान गोमले-२६

मनोहर सदाशिव गोमले-६२

भावेश बाबु गोमले-१९

अस्मिता सोनू गोमले-५८

बाळकृष्ण तुकाराम गोमले-६४

नितेश मधुकर गोमले-२३

दशरथ राजाराम गोमले-४५

अल्पेश विजय गोमले-२८

दिनेश विजय गोमले-२६

महेंद्र दत्ताराम गोमले-३२

अस्मिता अंकुश गोमले-४५

सदानंद बाबू गोमले-४७

    follow whatsapp

    ADVERTISEMENT