गजा मारणेसारखीच दोन गुंडांची मिरवणूक, जेलमधून बाहेर येताच समर्थकांचा धुडगूस; Video व्हायरल

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

टिटवाळा: पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणे (Gaja Marne) याची काही महिन्यापूर्वीच तळोजा जेलमधून सुटका झाल्यानंतर तळोजा ते पुणे अशी अक्षरश: मिरवणूक काढण्यात आली होती. त्यामुळे त्याला पुन्हा अटक करण्यात आली होती. असाच प्रकार आता कल्याण (Kalyan) तालुक्यातील वरप गावाजवळ असाच धक्कादायक प्रकार घडला आहे.

कल्याण-टिटवाळा परिसरात अनेक गुन्ह्यांमध्ये तुरुंगात असलेले व मोक्कासारख्या गुन्ह्यातील आरोपी जामिनावर सुटलेल्या गणेश मास्तर आणि महेश पाल यांची देखील अशाच प्रकारे मिरवणूक काढण्यात आली.

आरोपींच्या मित्रांकडून जल्लोष करून काढलेल्या मिरवणुकीचा व्हीडिओ आता व्हायरल होत आहे. एखादा नेता निवडून आल्यासारखा जल्लोष यावेळी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, आता पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

एकीकडे कोरोनाचं संकट कायम असताना दुसरीकडे जेलमधून सुटणाऱ्या आरोपींचे हे शक्तीप्रदर्शन खरोखरच ओंगळवाण्या स्वरुपाचं आहे. यामुळे आता आरोपींसह त्यांच्या समर्थकांवर देखील कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

गुंड गजा मारणेला मिरवणूक काढणं पडलं होतं भारी!

ADVERTISEMENT

गुंड गजानन मारणे याची दोन खुनाच्या प्रकरणात निर्दोष मुक्तता झाल्यानंतर त्याची 15 फेब्रुवारी रोजी तळोजा जेलमधून सुटका करण्यात आली होती. पण यावेळी सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे गजानन मारणेच्या सुटकेवेळी त्याच्या समर्थकांनी तळोजा जेलसमोर प्रचंड गर्दी केली होती.

ADVERTISEMENT

एवढंच नव्हे तर तळोजा ते पुणे अशी जंगी मिरवणूकच काढण्यात आली होती. यावेळी मुंबई-पुणे एक्सप्रेसवरुन तब्बल 300 हून अधिक कारचा ताफा यात सहभागी झाला होता.

तुरुंगातून सुटल्यानंतर गजा मारणेच्या समर्थकांनी त्याची काढलेली मिरवणूक ही एकाप्रकारे पोलीसांना दिलेलं आव्हान होतं. या मिरवणुकीनंतर मारणेविरोधात कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

स्वतःला रॉबिनहूड समजतो का? हायकोर्टाने गजा मारणेला फटकारलं

परंतु यात जामिन मिळवल्यानंतर पोलिसांनी मारणेविरोधात कारवाईचा फास आवळायला सुरुवात केली होती. मोक्का अंतर्गत गजा मारणेवर कारवाई करण्यासाठी पोलीस यंत्रणा पावलं उचलायला लागली होती.

याचाच एक भाग म्हणून पुणे, पिंपरी-चिंचवड, खालापूर पोलीस ठाण्यात गजा मारणेविरोधात पुन्हा गुन्हे दाखल करण्यात आले होते. ज्यानंतर त्याला साताऱ्याच्या जावळी तालुक्यातून पुन्हा अटक करण्यात आली होती.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT