...या बातम्या खोट्या आहेत, आदित्य ठाकरेंना द्यावं लागलं स्पष्टीकरण

शिवसेनेत अहोरात्र सेवा करणाऱ्यांनाच तिकीट मिळतं - आदित्य ठाकरे
...या बातम्या खोट्या आहेत, आदित्य ठाकरेंना द्यावं लागलं स्पष्टीकरण

एकीकडे देशात निवडणुक आयोगाने उत्तर प्रदेशसह ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे, तर महाराष्ट्रात आगामी काळात मुंबई, ठाण्यासह महत्वाच्या महापालिकांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. राज्यात ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा पेच अद्याप कायम असल्यामुळे निवडणुका कधी घेतल्या जातील याबद्दल अद्याप स्पष्टता आलेलं नसली तरीही राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे.

शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मुंबई महापालिकेत यापुढील निवडणुकांसाठी तरुणांचा विचार केला जाईल अशा बातम्या काही प्रसारमाध्यमांतून समोर आल्या होत्या. परंतू राज्याचे पर्यावरणमंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी या बातम्या खोट्या असल्याचं सांगितलं आहे.

शिवसेना पक्षात फक्त जनतेची अहोरात्र सेवा करणाऱ्यांनाच इतर कोणताही भेदभाव न करता तिकीट मिळतं असं आदित्य यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

ओबीसींना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राज्यात निवडणुका घेऊ नयेत असा सूर सर्वच राजकीय पक्षांनी घेतलेला आहे. परंतू निवडणुक आयोगाने काही नगर पंचायतींच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातलं महाविकास आघाडी सरकार निवडणुका पुढे ढकलण्याच्या प्रयत्नात असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होत्या.

...या बातम्या खोट्या आहेत, आदित्य ठाकरेंना द्यावं लागलं स्पष्टीकरण
महाराष्ट्रातील निर्बंधांमध्ये महत्वाचे बदल : ब्युटी पार्लर आणि जिम ५० टक्के क्षमतेने सुरु राहणार

परंतू मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी शिवसैनिकांशी साधलेल्या संवादात आगामी महापालिका निवडणुकांची तयारी करण्याचे आदेश दिले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीवरुन विरोधी पक्षातील भाजप चांगलीच आक्रमक झालेली आहे. परंतू उद्धव ठाकरेंनी विरोधकांना मी योग्य वेळेत उत्तर देईन असं म्हणत शिवसैनिकांना तयारीचे आदेश दिले आहेत.

...या बातम्या खोट्या आहेत, आदित्य ठाकरेंना द्यावं लागलं स्पष्टीकरण
विलीनीकरणाची मागणी रास्तच ! ST कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला आता शिवसेना आमदाराचाही पाठींबा

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in