TET घोटाळ्यात अब्दुल सत्तारांचे नाव, शिवसेनेनं केली चौकशीची मागणी

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे यांच्यातील राजकीय पेच सध्या कोर्टात आहे. शिवसेना विरुद्ध शिवसेना असा संघर्ष उभा राहिला आहे. कारण एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असेलले शिवसेनेचे बंडखोर ४० आमदार शिवसेना आमचीच असल्याचा दावा करत आहेत. आता पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पुन्हा एकदा उघड झाला आहे. यावेळी ठाकरे गटाने शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्याविरोधात चौकशीची मागणी केली आहे. शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी माहिती दिली आहे की पक्षाने अब्दुल सत्तार यांच्या चौकशीची मागणी केली आहे.

शिवसेनेचे अंबादास दानवे काय म्हणाले?

अंबादास दानवे म्हणाले ”अब्दुल सत्तार हे राज्य सरकारमध्ये मंत्री राहिले आहेत. टीईटी घोटाळ्यात त्यांच्या दोन मुलींची नावे समोर आली आहेत. 7,800 हून अधिक जण TET घोटाळ्यात सहभागी होते आणि या संदर्भात चौकशी करण्यात आली आहे. आता या घोटाळ्यात त्यांच्या मुलींची नावे समोर आल्याने आमची मागणी आहे की या संपूर्ण घोटाळ्यात अब्दुल सत्तार यांची काही भूमिका आहे का याची चौकशी व्हावी.”

अंबादास दानवे पुढे म्हणाले ”सत्तेत असताना हा प्रकार घडला असल्याने हा गंभीर आहे. त्यामुळे या प्रकरणात त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. यातील आरोपींना शिक्षा झाली पाहिजे, याच्या तपासासाठी शिवसेना आवाज उठवेल.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अब्दुल सत्तार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की आपली बदनामी केली जात आहे. याला उत्तर देताना दानवे म्हणाले “संपूर्ण घोटाळा बाहेर आला आहे. तपास अगोदरपासून सुरू आहे. प्रमाणपत्र कसे बनावट होते त्यात फेरफार कशी झाली ते आम्ही पाहत आहोत. हे पूर्वनियोजित दिसते म्हणून आम्ही आता आवाज उठवू.”

अंमलबजावणी संचालनालय (ED) टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) घोटाळ्याची चौकशी करत आहे. तपासानूसार 2020 मध्ये, हजारो TET उमेदवारांनी गैरव्यवहार केला आणि त्यांचे गुण वाढवले. त्यासाठी खूप पैसे देऊन बनावट प्रमाणपत्रे देखील तयार केली.

ADVERTISEMENT

या संपूर्ण प्रकरणावर अब्दुल सत्तार काय म्हणाले?

अब्दुल सत्तार हे औरंगाबादच्या सिल्लोड मतदार संघातील आमदार आहेत. शिवसेनेविरोधात बंडखोरी करणाऱ्या ४० आमदारांमध्ये अब्दुल सत्तार एक आहेत. अब्दुल सत्तार यावर म्हटले की ही कुटुंबाची आणि माझी बदनामी करण्याचे राजकीय षडयंत्र आहे. कोठडीत असलेल्या आरोपींपैकी कोणीही त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबाला भेटलेले नाही आणि त्यांच्या मुली 2020 च्या परीक्षेत नापास झाल्या आहेत. त्यांच्या नावाने टीईटी पात्रता प्रमाणपत्र जारी करण्यात आल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT