Crime : मुल होण्यासाठी आयुर्वेदीक औषध देण्याच्या बहाण्याने महिलेवर बलात्कार, गुन्हा दाखल

Crime : मुल होण्यासाठी आयुर्वेदीक औषध देण्याच्या बहाण्याने महिलेवर बलात्कार, गुन्हा दाखल

सातारा जिल्ह्यातील वाई येथील घटना, आरोपी फरार

मुल होण्यासाठी आयुर्वेदीक औषध देण्याच्या बहाण्याने मुंबई येथील पती आणि सासुचा विश्वास संपादन करुन २२ वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आल्यची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने या महिलेला सातारा जिल्ह्यातील वाई शहरात आणून एका अपार्टमेंटमध्ये डांबून ठेवत तिला मारहाण करत बलात्कार केल्याचं कळतंय.

या प्रकरणात विवाहीत महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन वाई पोलीस ठाण्यात आरोपी विठ्ठल गणपत पवारविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime : मुल होण्यासाठी आयुर्वेदीक औषध देण्याच्या बहाण्याने महिलेवर बलात्कार, गुन्हा दाखल
अत्याचाराचा कळस! चिमुकलीच्या गळ्यावर चाकू ठेवून नराधमाने आईवर केला बलात्कार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई मधील एका २२ वर्षीय महिलेच्या पतीची आणि सासुची विठ्ठल पवारसोबत ओळख होती. विठ्ठल पवारने महिलेच्या सासरच्या मंडळींना मुल होण्यासाठी आयुर्वेदीक औषध मिळाल्याचं सांगत विश्वास संपादन केला. यानंतर आरोपीने विवाहीत महिलेला औषध देण्याच्या बहाण्याने साताऱ्यातील वाई शहरात आणलं.

Crime : मुल होण्यासाठी आयुर्वेदीक औषध देण्याच्या बहाण्याने महिलेवर बलात्कार, गुन्हा दाखल
Crime: वासनांध शिक्षकाचं घृणास्पद कृत्य! इतर विद्यार्थिनींना सुटी देऊन एका मुलीला वर्गात थांबवलं आणि....

वाई शहरात एका अपार्टमेंटमध्ये या महिलेला डांबून ठेवत आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. यानंतर आरोपीने पीडित महिलेला यवतमाळला आपल्या नातेवाईकाच्या घरी घेऊन जात तिच्या इच्छेविरुद्ध शारिरिक संबंध ठेवले. तसेच या घटनेबद्दल कोणाला सांगितलंस तर जिवे मारण्याची धमकीही दिली. सदर महिलेने मुंबईत कुर्ला पोलीस ठाण्यात याची माहिती दिल्यानंतर हा गुन्हा वाई पोलीस ठाण्यात हस्तांतरित करण्यात आला आहे. पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in