नारायण राणेंच्या ‘या’ बंगल्यावर होणार कारवाई, राणे विरुद्ध शिवसेना वाद आणखी पेटणार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि शिवसेना यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच. आता सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील मालवणच्या चिवला बीचला लागून असलेल्या ‘नील रत्न’ या नारायण राणेंच्या बंगल्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारत सरकारच्या (Central Govt.) पर्यावरण आणि वन मंत्रालयाच्या नागपूर कार्यालयाने महाराष्ट्र कोस्टल प्राधिकरणाला अशा प्रकारचे आदेश दिले आहेत.

नारायण राणेंच्या मुंबईतील ‘अधिश’ बंगल्याच्या पाहाणी नाट्यानंतर आता मालवणमधील ‘नील रत्न’ बंगल्यावर कारवाईचे आदेश देण्यात आल्याने राणे विरुद्ध शिवसेना हा वाद चिघळणार असल्याचं पाहायला मिळत आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मुंबईतील बंगल्यावरुन देखील राणे विरुद्ध शिवसेना वाद

संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेनंतर नारायण राणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर त्यांना त्यांच्या मुंबईतील जुहूमधील ‘अधिश’ या बंगल्यातील बांधकामाविषयी महापालिकेकडून नोटीस बजावण्यात आली होती. ज्याविषयी काल (19 फेब्रुवारी) पत्रकार परिषद घेऊ राणेंनी काही गोष्टी स्पष्ट केल्या होत्या.

ADVERTISEMENT

काय म्हणाले होते नारायण राणे?

ADVERTISEMENT

‘जवळपास 13-14 वर्ष मी या घरात येऊन झाली आहे. या इमारतीचे आर्किटेक्ट तलाठी आहेत. जगभरात त्यांचं नाव आहे. नामांकित आर्किटेक्टने ही इमारत बांधली आहे. ती बांधल्यानंतर 1991च्या डीसी नियमाप्रमाणे ती बांधली. ताबा देण्यात आला. ऑक्युपेशन सर्टिफिकेट बीसीसी या दोन्ही गोष्टी पालिकेने दिल्या होत्या. एकही गोष्ट अपूर्ण न ठेवता 100 टक्के कायदेशीर काम मी केलं आहे. त्यानंतर एक इंचही बांधकाम मी केलेलं नाही.’

‘या घरात माझी पत्नी, मी, दोन मुलं आणि त्यांचे दोन छोटे असे आठ लोकं आम्ही राहतो. इथे कोणत्याही प्रकारे हॉटेलिंग वगैरे चालत नाही. 100 टक्के रेसिडेन्शियल इमारत आहे. आजूबाजूच्यांनाही विचारा. असं असतानाही शिवसेनेकडून, मातोश्रीकडून नोटीस लावण्याचं काम केलं गेलं. पालिका त्यांच्याकडे आहे. सातत्याने 2015-16-17 साली तक्रारी करायच्या, पालिकेकडून सगळे प्लॅन बघितले जायचे आणि काही अवैध नाही असं म्हणून उत्तर पाठवायचे.’

मातोश्री २ चं बेकायदा काम पैसे देऊन रेग्युलर करण्यात आलं, नारायण राणेंचा आरोप

‘दुसरीकडे ‘मातोश्री 2′ चं बेकायदा बांधकाम पैसे देऊन रेग्युलर करण्यात आलं आहे. आम्ही काही बोललो का?’ असा आरोपही यावेळी नारायण राणेंनी केला होता.

दिशा सालियनची 8 जूनला बलात्कार करून हत्या करण्यात आली, नारायण राणेंचा पुन्हा आरोप

दिशा सालियनबाबत काय म्हणाले नारायण राणे?

कालच्या पत्रकार परिषदेत राणे पुन्हा एकदा दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत यांची हत्या झाली असल्याचा पुनरुच्चार केला होता. ‘दिशा सालियनची 8 जूनला बलात्कार करून हत्या करण्यात आली होती. दिशा सालियनला त्या पार्टीला जाण्याची इच्छा नव्हती. तिचा पोस्टपॉर्टेम रिपोर्ट का आलेला नाही? दिशा सालियन ज्या इमारतीत राहायची त्या इमारतीतल्या रजिस्ट्ररचं 8 जूनचं पान का फाडण्यात आलं?’ असे प्रश्न केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उपस्थित केले होते.

‘दिशा सालियन सोबत जे काही घडलं ते सुशांतला समजलं होतं. त्याच्यासोबत काही लोकांचा वाद झाला त्यानंतर त्याची हत्या करण्यात आली आणि आत्महत्या केल्याचं भासवण्यात आलं.’ असाही आरोप नारायण राणेंनी केला होता.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT