'छत्रपती शिवरायांचे नुसते पुतळे उभारून चालणार नाही, त्यानंतर....' नाना पाटेकरांचं वक्तव्य चर्चेत

जाणून घ्या ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी नेमकं काय म्हटलं आहे?
'छत्रपती शिवरायांचे नुसते पुतळे उभारून चालणार नाही, त्यानंतर....' नाना पाटेकरांचं वक्तव्य चर्चेत

छत्रपती शिवाजी महाराजांचे नुसते पुतळे उभारून चालणार नाही. पुतळे उभे केल्यानंतर आपली जबाबदारी वाढते. छत्रपतींचे विचार आणि त्यांची सर्वधर्मसमभावाचं धोरण हे आपल्याला आत्मसात करावं लागेल असं वक्तव्य अभिनेते नाना पाटेकर यांनी पुण्यात केलं आहे.

पुण्यातील बाणेरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या अनावरण सोहळ्यात पत्रकारांशी बोलताना नाना पाटेकर यांनी अनेक मुद्दे मांडले आहेत. महाराजांची विचारसरणी ही सर्वधर्म समभाव आहे आणि आपण जर तीच विचारसरणी अंमलात आणली तर आताचे सर्व प्रश्न सुटतील. अशी भूमिका देखील नाना पाटेकर यांनी मांडली आहे. त्याचबरोबर शिवाजी महाराजांच्या विचारांचा उपयोग काही राजकीय आणि विद्वान मंडळी स्वतःच्या फायद्यासाठी करतात. त्याकडे लक्ष देऊ नका असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

छत्रपती शिवरायांचे पुतळे उभारणं, स्मारक उभारणं हे महत्त्वाचं आहे. त्यापेक्षा महत्त्वाचं आहे ते म्हणजे त्यांचे विचार आत्मसात करणं आणि ती आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे असंही नाना पाटेकर यांनी म्हटलं आहे.

'छत्रपती शिवरायांचे नुसते पुतळे उभारून चालणार नाही, त्यानंतर....' नाना पाटेकरांचं वक्तव्य चर्चेत
पुणे: 'मी पण नथुराम झालो होतो', नाना पाटेकरांकडून अमोल कोल्हेंची पाठराखण

चित्रपटगृहांमधल्या निर्बंधाबाबत काय म्हणाले नाना पाटेकर?

कोरोनाबाबत बोलताना ते म्हणाले की, कोरोनाचे निर्बंध लावायला सरकारला आनंद होतोय का? चित्रपटगृहं आणि नाट्यगृहं पूर्ण क्षमतेने चालू करणं गरजेची आहेत. सध्या सर्व क्षेत्रातील माणसांची अवस्था बिकट आहे त्यामुळे कोरोनाचे निर्बंध हळूहळू कमी करणे गरजेचे आहेत असे मत व्यक्त केले.

'छत्रपती शिवरायांचे नुसते पुतळे उभारून चालणार नाही, त्यानंतर....' नाना पाटेकरांचं वक्तव्य चर्चेत
काही गलिच्छ डॉक्टर मंडळीनी पेशाला काळीमा लावला: नाना पाटेकर

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असो किंवी त्यांच्या विचारांचा जागर प्रत्येकाने घातला पाहिजे मात्र सध्या परिस्थिती वेगळी आहे. शिवाजी महाराजांच्या विचारांचा उपयोग काही राजकीय आणि विद्वान मंडळी स्वतःच्या फायद्यासाठी करतात त्याकडे नागरिकांनी लक्ष देऊ नये असे सांगत त्यांनी सरकारकडे कोरोनाचे निर्बंध उठवण्याची मागणी केली तसंच हळूहळू निर्बंध उठवले जातील हा विश्वास आपल्याला असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

नाम फाउंडेशन स्थापन केल्यावर त्यामार्फत खूप काम झालं आहे, आणि त्याल सगळ्यांची मदत झाली आहे म्हणून कुणावरही वैयक्तिक टिका करणे टाळतो. तसेच मला याचं वाईट की आपण ही दैवतं वाटून घेतली आहेत. बाबासाहेब आंबेडकर माझे आहेत, महाराज माझे आहेत, आणि टिळकही माझे आहेत असे मत त्यांनी व्यक्त केले.माणूस म्हणून एकमेकांना ओळखायला लागू तेव्हा या स्मारकाचे महत्व समजेल असे सांगत या काळात ब्राह्मण-ब्राह्मणेत्तर वाद नकोत अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in