अवघ्या 24 तासात अभिनेते रझा मुराद यांना 'स्वच्छता ब्रँड अॅम्बेसेडर' पदावरून हटवलं!

मध्य प्रदेश सरकारने अभिनेते रझा मुराद यांना 'स्वच्छता ब्रँड अॅम्बेसेडर' पदावरून हटवलं आहे.
अवघ्या 24 तासात अभिनेते रझा मुराद यांना 'स्वच्छता ब्रँड अॅम्बेसेडर' पदावरून हटवलं!
actor raza murad removed from the post of swachhata brand ambassador within 24 hours bhopal municipal corporation mp(फाइल फोटो)

Bollywood Actor Raza Murad Controversy: भोपाळ: मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये महानगरपालिकेच्या (Bhopal Municipal Corporation) स्वच्छता ब्रँड अॅम्बेसेडरवरून मोठा वाद सुरू झाला आहे. गुरुवारीच भोपाळ महापालिकेने अभिनेते रझा मुराद यांना भोपाळ महापालिकेचे स्वच्छतादूत बनवले होते. याअंतर्गत रझा मुराद यांना शहरातील रहिवाशांमध्ये स्वच्छता जनजागृतीचा संदेश देण्यासाठी जायचे होते. पण अवघ्या 24 तासात नगरविकास मंत्र्यांनी रझा मुराद यांना स्वच्छता ब्रँड अॅम्बेसेडरवरून हटवण्याचे पत्र पालिका आयुक्तांना दिले आहे.

नगरविकास मंत्री भूपेंद्र सिंह यांचे विशेष सहाय्यक राजेंद्र सिंह सेंगर यांनी भोपाळ महापालिका आयुक्तांना पत्र पाठवले आहे. त्यात असे लिहिले आहे की, 'माननीय मंत्र्यांच्या निदर्शनास आले आहे की, चित्रपट कलाकार रझा मुराद यांना भोपाळ महानगरपालिकेने स्वच्छतेचे ब्रँड अॅम्बेसेडर बनवले आहे. तर ब्रँड अॅम्बेसेडर अशा व्यक्तीला व्हायला हवे, ज्याने स्वच्छतेसाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे किंवा भोपाळच्या संस्कृतीची चांगली ओळख आहे.'

'त्यामुळे, वरील संदर्भात, माननीय मंत्री यांनी आदेश तात्काळ रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत. भोपाळच्या संस्कृतीशी परिचित असलेल्या किंवा स्वच्छतेच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या कोणत्याही प्रतिष्ठित व्यक्तीला किंवा संस्थेला ब्रँड अॅम्बेसेडर बनविण्याचे निर्देश देण्यात आले.'

काँग्रेस समर्थक म्हणून रझा मुराद यांना स्वच्छता ब्रँड अॅम्बेसेडर पदावरुन हटवलं?

मंत्री भूपेंद्र सिंह यांच्या नाराजीनंतर आणि निर्देशानंतर महापालिका आयुक्त के व्हीएस चौधरी यांनी याबाबतचा आदेश रद्द केला. यामागचे कारण असे सांगितले जात आहे की, चित्रपट अभिनेता रझा मुराद यांनी 2018 मध्ये मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान भोपाळमधील काँग्रेस उमेदवाराच्या समर्थनार्थ प्रचार केला होता. त्यामुळे भाजप सरकारचे मंत्री भूपेंद्र सिंह यांना भोपाळ महापालिकेचा हा निर्णय आवडलेला नाही.

संजय लीला भन्साळी यांचा रामलीला, पद्मावत यासारख्या अनेक मोठ्या चित्रपटांचा भाग असलेले अभिनेते रझा मुराद हे प्रसिद्ध कलाकार मुराद साहेब यांचे पुत्र आहेत.

actor raza murad removed from the post of swachhata brand ambassador within 24 hours bhopal municipal corporation mp
'कोणाच्या भाकरीवर टाच आणणार असाल तर ते योग्य नाही', किरण मानेंच्या समर्थनार्थ राजकीय नेते मैदानात

राजकीय भूमिका घेतल्यामुळे अभिनेता किरण मानेला मालिकेतून काढलं?

दुसरीकडे महाराष्ट्रातही असाच काहीसा प्रकार घडल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. स्टार प्रवाह या चॅनलवर मुलगी झाली हो या प्रसिद्ध मालिकेत विलास पाटील हे पात्र साकारणाऱ्या अभिनेता किरण मानेची मालिकेतून हकालपट्टी झाल्याचं कळतंय. अभिनेता किरण माने हा नेहमी आपल्या सडेतोड भूमिकेसाठी ओळखला जातो. अभिनयासोबत सोशल मीडियावर अनेक विषयांवर त्याने आपली परखड मतं मांडली आहे. आर्यन खान ड्रग्ज केस प्रकरणापासून ते शेतकरी आंदोलानापर्यंत अनेक विषयांवर किरण माने आतापर्यंत सोशल मीडियावर व्यक्त झाला आहे. अनेकदा यासाठी त्याला ट्रोलिंगही सहन करावं लागलं.

परंतू याच राजकीय भूमिका घेण्यामुळे किरण मानेला मालिकेतून बाहेर काढण्यात आल्याचा दावा केला जात आहे. काही प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीनंतर फेसबूक पोस्टच्या माध्यमातून किरण मानेने याबद्दल सूचक इशारा दिला आहे.

सोशल मीडियावर ही बातमी व्हायरल झाल्यानंतर किरण माने यांनी एक फेसबूक पोस्ट टाकत, मला कितीही संपवण्याचा प्रयत्न केलात तरी मी शांत बसणार नाही असं म्हटलं आहे. प्रसारमाध्यमांशी बोलत असताना किरण माने याने आपल्याला मालिकेतून काढून टाकण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in