Shilpa Shetty ची हायकोर्टात धाव, मीडिया रिपोर्टिंगबाबत याचिका

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पॉर्न फिल्म प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला जामीन नाकारण्यात आला आहे. त्यामुळे राज कुंद्राच्या अडचणी वाढत आहेत असं चित्र दिसतंय. अशातच अभिनेत्री शिल्पा शेट्टीने आता थेट बॉम्बे हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. अश्लील चित्रपट निर्मितीच्या प्रकरणात चुकीच्या पद्धतीने वार्तांकन करून प्रतिमा मलीन होत असल्याचा आरोप करत शिल्पा शेट्टीने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

राज कुंद्राचे वकील सुभाष जाधव यांनी राज कुंद्राच्या जामिनासाठी बॉम्बे हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र हायकोर्टाने याचिकेवर सुनावणी दरम्यान जामीन देण्यास नकार दिला. त्यानंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टीने बॉम्बे हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. सोशल मीडिया, मीडिया हाऊसेस आणि इतर प्रसारमाध्यमांवर आपली प्रतिमा मलीन करणारं वार्तांकन केलं जातं आहे या सगळ्याला आळा घालावा अशी मागणी शिल्पा शेट्टीने तिच्या याचिकेत केली आहे.

पॉर्न फिल्म प्रकरणात माझे नाव जोडून प्रसारमाध्यांवर त्या संदर्भात बातम्या प्रसारित केल्या जात असल्याने मीडिया हाऊसनी बिनशर्त माफी मागावी आणि 25 कोटी रूपयांची मानहानीची मागणी देखील या याचिकेत करण्यात आली आहे. तसंच बदनामीजनक वृत्तांकन केलेली सर्व माहिती ताबडतोब काढून टाकण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अश्लील चित्रपट प्रकरणापासून दूर असल्याबाबत दिलेल्या प्रतिक्रियेवर कोणतीही खात्री न करता दिशाभूल करणाऱ्या वार्तांकनामुळे प्रतिमेचं नुकसान झाल्याचा आरोप शिल्पा शेट्टीने या याचिकेमध्ये केला आहे. तसंच या प्रकरणात मला अपराधी असल्याचं दाखवण्यात आलं असून पती राज कुंद्रावर सुरू असलेल्या खटल्यामुळे पतीला सोडून दिलं असल्याचं देखील चुकीचं वार्तांकन करण्यात आलं असल्याचं शिल्पा शेट्टीने म्हटलं आहे. माध्यमांनी चुकीचे, अपमानजनक, खोटे आणि बदनामीकारक वृत्त प्रकाशित केले आहेत आणि केवळ बदनामीच केली नाही तर आपली प्रतिमा देखील मलीन केली गेली आहे असाही आरोप तिने या याचिकेत केला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT