'...तर मी पद्मश्री पुरस्कार परत करते' स्वातंत्र्याबाबतच्या वक्तव्यानंतर कंगनाची प्रतिक्रिया

जाणून घ्या कंगना रणौतने आता नेमकं काय म्हटलं आहे?
'...तर मी पद्मश्री पुरस्कार परत करते' स्वातंत्र्याबाबतच्या वक्तव्यानंतर कंगनाची प्रतिक्रिया

कंगना रणौतने एका मुलाखतीत स्वातंत्र्याबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर तिच्यावर टीकेची झोड उठली. कंगनाने एका मुलाखतीत एक वक्तव्य केलं होतं की 1947 ला आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य नव्हतं तर ती एक भीक होती. खरं स्वातंत्र्य आपल्याला 2104 ला मिळालं. असं वक्तव्य केलं होतं, त्यानंतर कंगनावर टीकेची झोड उठली. एवढंच नाही तर तिचा पद्मश्री पुरस्कार परत घेण्याचीही मागणी होऊ लागली. आता या सगळ्या वादावर कंगनाने एक पोस्ट शेअर केली आहे. पुरस्कार परत करण्याची मागणी करणाऱ्यांना तिने उत्तर दिलं आहे.

'...तर मी पद्मश्री पुरस्कार परत करते' स्वातंत्र्याबाबतच्या वक्तव्यानंतर कंगनाची प्रतिक्रिया
कंगना रणौत विरोधात पुण्यातल्या चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

काय म्हटलं आहे कंगनाने?

मी माझ्या मुलाखतीत स्पष्टपणे सांगितलं आहे की स्वातंत्र्यासाठी पहिलं संघटित युद्ध 1857 ला झाले. ही बाब मलाही माहित आहे, मात्र मला 1947 ला कोणती लढाई झाली ते माहित नाही. जर मला कुणी या प्रकरणी माहिती दिली तर मी माझा पद्मश्री पुरस्कार परत करते, माफीही मागेन असं आव्हान आता कंगनाने दिलं आहे. यासंदर्भात कंगनाने आता इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये तिने हे प्रश्न विचारले आहेत.

आणखी काय म्हटलं आहे कंगनाने?

मी शहीद राणी लक्ष्मीबाईसारख्या सिनेमात काम केलं आहे. 1857 च्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्यावर बरेच संशोधन झालं आहे. राष्ट्रवादासोबत दक्षिण पंथाचा उदय झाला पण ते अचानक नष्ट कसं झालं? महात्मा गांधी सिंग यांना मरू का दिलं? सुभाषचंद्र बोस यांची हत्या का झाली? त्यांना गांधींजींचा पाठिंबा कधीच का मिळाला नाही? इंग्रजांनी विभाजन का केलं? भारतीय स्वातंत्र्याचा आनंद साजरा करण्याऐवजी एकमेकांना मारत का होते? मला या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत ती कुणी देईल का?

'मी जी मुलाखत दिली त्यामध्ये मी कोणत्याही शहिदाचा किंवा कोणत्या स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान केला आहे हे जरी मला कुणी दाखवलं तरीही मी माझा पद्मश्री पुरस्कार परत करेन. मुलाखतीच्या छोट्या छोट्या क्लिप व्हायर करण्यात काहीही अर्थ नाही. माझं संपूर्ण म्हणणं दाखवा आणि पुढे येऊन सगळं सत्य सांगा, मी सगळ्या परिणामांना सामोरी जायला तयार आहे' असंही कंगनाने आता म्हटलं आहे.

2014 मध्ये मिळालेले स्वातंत्र्य हे वक्तव्य जी मी केलं. मी म्हणाली होती की आपल्याकडे दाखवण्यासाठी स्वातंत्र्य असले तरी भारताच्या चेतनेला आणि विवेकाला 2104 मध्ये स्वातंत्र्य मिळाले. तेव्हा एक मृत असलेली सभ्यता जिवंत झाली आणि त्या सभ्यतेने पंख पसरले आणि आता ती सभ्यता जोरात गर्जना करत आहे. आज पहिल्यांदा लोक इंग्रजी न बोलता किंवा छोट्या शहरातून आलेले किंवा 'मेड इन इंडिया' उत्पादन बनवल्याबद्दल आपला अपमान करू शकत नाही. त्या मुलाखतीत सगळ्या गोष्टी स्पष्ट आहेत. लेकिन जो चोर हैं उनकी तो जलेगी कोई बुझा नहीं सकता। जय हिंद!

कंगना रणौत
कंगना रणौत फोटो सौजन्य- कंगना रणौत -फेसबुक पेज

काय आहे प्रकरण?

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही अनेकदा तिच्या वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अनेकदा काही वक्तव्यं करुन कंगनाने वाद ओढावून घेतल्याचं आतापर्यंत आपण पाहिलं आहे. आता देखील कंगनाने एक अशाच पद्धतीचं अत्यंत वादग्रस्त विधान केलं आहे. ज्यावरुन सोशल मीडियावर तिच्याविरोधात टीकेची झोड उठली आहे. कंगनाने एका कार्यक्रमात असं वक्तव्य केलं आहे की, '1947 साली जे स्वातंत्र्य मिळालं ते स्वातंत्र्य नव्हतं तर ती भीक होती. खरं स्वातंत्र्य हे 2014 साली मिळालं आहे.' असं वक्तव्य कंगनाने केलं. ज्यानंतर आता कंगनावर टीका होताना दिसते आहे. एवढंच नाही तर तिच्याविरोधात मुंबई आणि पुण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

कंगना नेमकं काय म्हणाली होती?

'सावरकर, राणी लक्ष्मीबाई, नेते सुभाषचंद्र बोस या लोकांबद्दल बोललो तर या लोकांना माहित होते की रक्त सांडावं लागेल. पण ते हिंदुस्थानी-हिंदुस्थानींचं रक्त सांडू नये.. अर्थातच त्यांनी स्वातंत्र्याची किंमत चुकवली. पण तेव्हा जे स्वातंत्र्य मिळालं ती भीक होती. आपल्याला खरं स्वातंत्र्य हे 2014 साली मिळालं आहे.'

या कार्यक्रमात कंगना असंही म्हणाली की, 'काँग्रेसची सत्ता असताना मला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. जेव्हा मी राष्ट्रवाद, सैन्य सुधारणा आणि माझ्या संस्कृतीचा प्रचार करते तेव्हा लोक म्हणतात की, मी भाजपचा अजेंडा चालवत आहे. खरं तर हा मुद्दा भाजपचा अजेंडा का असावा.. हा तर देशाचा अजेंडा असला पाहिजे.'

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in