Advertisement

Big News : Shilpa Shetty चा पती राज कुंद्राला अटक, अश्लील फिल्म प्रकरणी कारवाई

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने केली राज कुंद्राला अटक
Big News : Shilpa Shetty चा पती राज कुंद्राला अटक, अश्लील फिल्म प्रकरणी कारवाई

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा हा वादांमध्ये अडकल्याचं दिसतं आहे. आता समोर आलेल्या माहितीनुसार राज कुंद्राला अश्लील फिल्म तयार करणं आणि त्या काही App वर रिलिज करणं या प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे. आधी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बराच वेळ राज कुंद्राची चौकशी केली त्यानंतर त्याला अटक केली आहे.

सोमवारी शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने चौकशीसाठी बोलावलं. त्यानंतर आता काही वेळापूर्वी राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. राज कुंद्रा एखाद्या प्रकरणात अडकण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही राज कुंद्रा काही वादग्रस्त प्रकरणांमध्ये अडकला आहे. याआधी एका प्रकरणात अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेने राज कुंद्रावर आरोप केला होता की राज कुंद्राने तिच्या फोटोंचा गैरवापर केला आहे. राज कुंद्राने या प्रकरणी झालेले आरोप फेटाळून लावले होते तसंच माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही असंही सांगितलं होतं. एवढंच नाही तर त्यावेळी त्यांनी हे देखील सांगितलं होतं की ज्या कंपनीने अश्लील व्हीडिओ तयार केले होते ती कंपनी मी कधीच सोडली आहे.

काय आहे प्रकरण?

फेब्रुवारी 2021 या महिन्यात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अश्लील फिल्म तयार करणं आणि त्या काही App वर रिलिज करणं याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. या प्रकरणातच राज कुंद्रा याची चौकशी करण्यात आली आणि त्याला अटक करण्यात आली. अश्लील सिनेमांच्या निर्मितीमागे राज कुंद्रा यांचाच हात आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे तसंच त्याच्या विरोधात आमच्याकडे पुरावे आहेत असंही पोलिसांनी म्हटलं आहे. या प्रकरणी आता तपास सुरू आहे.

यापूर्वी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याविरुद्ध एका उद्योगपतीने मार्च 2020 मध्ये तक्रार केली होती. मुंबईतील एक नॉन-रेसिडेन्शिअल इंडियन उद्योगपती सचिन जे. जोशी यांनी पोलिसात तक्रारीत केली होती. हे प्रकरण सोन्याचा व्यापार करणारी कंपनी ‘सतयुग गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड’शी (एसजीपीएल) संबंधित होतं.

राज कुंद्रा हा यापूर्वी या कंपनीचे माजी संचालक होता. मुंबईतील खार पोलीस स्टेशनमध्ये जोशी यांनी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा, गणपती चौधरी, मोहम्मद सैफीसह एसजीपीएलच्या इतर अधिकाऱ्यांवर फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली होती.सचिन जोशी आणि राज कुंद्रा-शिल्पा शेट्टी यांच्यात 2014 रोजी देवाण-घेवाणीवरुन वाद झाला होता.

त्याआधीही शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा अनेक वादात सापडले आहेत. अंडरवर्ल्ड डॉन इक्बाल मिर्ची यांच्यासोबत राज कुंद्राचे आर्थिक संबंध असल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला आहे. ईडीने यासंबंधी कुंद्रा यांना नोटीसही दिली होती. पण कुंद्रा यांनी हे सर्व आरोप फेटाळले होते.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in