Covid 19 : '31 डिसेंबरला पार्टी केलीत, निर्बंध मोडलेत तर खबरदार...' आदित्य ठाकरेंनी दिला इशारा

जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत आदित्य ठाकरे?
Covid 19 : '31 डिसेंबरला पार्टी केलीत, निर्बंध मोडलेत तर खबरदार...' आदित्य ठाकरेंनी दिला इशारा

31 डिसेंबरला पार्टी केली किंवा जे निर्बंध सरकारने लावले आहेत ते मोडले तर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा आज आदित्य ठाकरे यांनी दिला आहे. मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यानंतर कोरोनाची तिसरी लाट आलेली असू शकते असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. मागच्या महिन्यात कोरोनाच्या केसेस 150 च्या आसपास होत्या त्या आता अडीच हजारांपर्यंत पोहचल्या आहेत. त्यामुळे अधिक सतर्कता बाळगणं गरजेचं आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

Covid 19 : '31 डिसेंबरला पार्टी केलीत, निर्बंध मोडलेत तर खबरदार...' आदित्य ठाकरेंनी दिला इशारा
Omicron : दक्षिण अफ्रिकेतून गेल्या 19 दिवसात सुमारे एक हजार प्रवासी मुंबईत-आदित्य ठाकरे

हॉटेल, रेस्तराँ किंवा कोणीही निर्बंध मोडले तर कारवाई करणार. 25 टक्के आणि 50 टक्के याची जी मर्यादा घालून दिली आहे ती मोडली तरीही कारवाई केली जाणार. 31 डिसेंबरला सार्वजनिक ठिकाणी निर्बंध लागू असतील, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. गर्दी केली, नियम मोडले तरीही कारवाई केली जाणार. संबंधित आस्थापना किंवा हॉटेल्स, रेस्तराँ यांनी जर नियम मोडले तर आम्ही त्या आस्थापना, रेस्तराँ, हॉटेल्स सील करणार. पुढील काही महिन्यांसाठी ते सील केले जातील असंही आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलं.

आणखी काय म्हणाले आदित्य ठाकरे?

कुणीही घाबरण्याची गरज नाही, पण काळजी घेतली पाहिजे, असं आदित्य ठाकरे म्हणाले. शाळा, कॉलेज बंद करण्याबाबत अजून काहीही निर्णय घेतलेला नसल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. पण गरज पडली तर पुढच्या आठवड्यात निर्णय घेऊ, असं देखील आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

15 ते 18 वर्षासाठी जे लसीकरण सुरु करण्यात आलं आहे, त्याचा आढावा घेतला. याच आठवड्यात मुंबईतील शाळांबरोबर, कॉलेजसबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन त्या शाळा कॉलेजसमध्ये कशा पद्धतीने लसीकरण सुरु करु शकतो यावर उपायोजना करणार आहोत, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. तीन तारखेपासून लसीकरण सुरु करण्याचा मानस आहे. बुस्टरसाठी ज्यांनी दुसरा डोस घेतल्याच्या नऊ महिन्यानंतर बुस्टर घेणं गरजेचं आहे. किती लोकं येतात, किती फ्रंटलाईन वर्कर्स आहेत, हेल्थ वर्कर्स आहेत, 60 वर्षाच्या वर किती लोकं आहेत, याची यादी आम्ही काढत आहोत. जरी केसेस वाढत असल्या तरी एकदम पॅनिक होण्याची गरज नाही. ज्या इमारतीमध्ये जास्त रुग्ण सापडतील त्या सील केल्या जातील. मुंबईत 54 हजार बेड्स उपलब्ध आहेत, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.

Covid 19 : '31 डिसेंबरला पार्टी केलीत, निर्बंध मोडलेत तर खबरदार...' आदित्य ठाकरेंनी दिला इशारा
महाराष्ट्र लॉकडाऊनच्या दिशेनं?, सेलिब्रेशनच्या उत्साहावर निर्बंधांचं विरजण, नियमावली जाहीर

नेमकी काय आहे नियमावली?

संपूर्ण राज्यभर सर्व सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री 9 ते सकाळी 6 यावेळेत बंदी.

लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या 100 च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या 250 च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जे कमी असेल ते.

इतर सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील उपस्थितांची संख्या 100 च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या 250 च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जे कमी असेल ते.

उपरोक्त दोन्ही कार्यक्रमांव्यतिरिक्तच्या कार्यक्रमांसाठी बंदिस्त जागेत जिथे आसनक्षमता निश्चित आहे अशाठिकाणी क्षमतेच्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त नसेल तसेच जिथे आसनक्षमता निश्चित नाही अशा ठिकाणी 25 टक्के उपस्थिती असेल. अशा प्रकारच्या सर्व कार्यक्रमांमध्ये ते जर खुल्या जागेत होत असतील तर आसनक्षमतेच्या 25 टक्के पेक्षा जास्त उपस्थिती नसेल.

क्रीडा स्पर्धा, खेळाचे समारंभ यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या 25 टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नसेल.

कोणत्याही प्रकारात न मोडणाऱ्या समारंभ किंवा एकत्र येण्याच्या कार्यक्रमात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण उपस्थितांची संख्या किती असावी हे निश्चित करेल. असे करतांना 27 नोव्हेंबर 2021 चे आपत्ती व्यवस्थापनाच्या आदेशाचे पालन होईल असे बघितले जाईल.

उपहारगृहे, जीम, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे या ठिकाणी क्षमतेच्या 50 टक्के उपस्थिती राहील. या सर्वांना त्यांची संपूर्ण क्षमता तसेच 50 टक्के क्षमतेची संख्या जाहीर करावी लागेल.

याशिवाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास आवश्यक वाटेल तिथे निर्बंध लावता येतील आणि ते करण्यापूर्वी त्यानी जनतेस त्याची कल्पना देणे आवश्यक राहील.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in