Ahmedabad मध्ये Non-Veg स्टॉलवर बंदी, गुजरातमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात

Ahmedabad Non-Veg food stalls Ban: अहमदाबादमध्ये रस्त्यावर अंडी आणि मांसाहाराचे स्टॉल लावण्यास आता बंदी घालण्यात आली आहे. पाहा नेमका काय आहे हा निर्णय.
Ahmedabad मध्ये Non-Veg स्टॉलवर बंदी, गुजरातमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात
ahmedabad amc banned stalls selling non-veg food alongside roads in 100 m radius of schools colleges religious spots(प्रातिनिधिक फोटो)

अहमदाबाद: गुजरातमधील राजकोट, वडोदरा, जुनागढ आणि भावनगर महानगरपालिकेने उघड्यावर अंडी आणि मांसाहार विक्री करणाऱ्या स्टॉल्सवर बंदी घातली होती. आता गुजरातमधील आणखी एका अत्यंत महत्त्वाच्या शहराने असाच निर्णय घेतला आहे. अहमदाबाद महानगरपालिकेनेही उघड्यावर अंडी आणि मांसाहारी पदार्थांचे स्टॉल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अहमदाबाद महापालिकेनेही यासंदर्भात आदेशही जारी केले आहेत.

अहमदाबाद महानगरपालिकेने जारी केलेल्या आदेशानुसार धार्मिक स्थळे, उद्याने, शाळा महाविद्यालये तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर खाद्यपदार्थांचे स्टॉल लावता येणार नाहीत. अहमदाबाद महापालिकेने जारी केलेला हा आदेश 16 नोव्हेंबरपासून लागू होणार आहे, म्हणजेच 16 नोव्हेंबरपासून सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले जाणार नाहीत.

अहमदाबाद महानगरपालिकेच्या इस्टेट विभागाचे अध्यक्ष देवांग दाणी यांनी सांगितले की, मुख्य रस्त्यापासून 100 मीटरच्या आत असलेले सर्व खाद्यपदार्थांचे स्टॉल हटवले जातील. मांसाहार विक्री करणाऱ्यांना परवाना आवश्यक असेल. या निर्णयावर काँग्रेस नेते दिनेश शर्मा यांनी भाजपवर हल्लाबोल केला. निवडणुका आल्या की भाजप धर्माचे राजकारण करू लागते, असा आरोप त्यांनी केला आहे.

दुसरीकडे, अहमदाबादमध्ये अंडी आणि मांसाहारी पदार्थांचे स्टॉल लावणाऱ्या लोकांना आता त्यांच्या रोजगाराची चिंता वाटू लागली आहे. गेली 10 वर्षे विद्यापीठाबाहेर अंडी विकणारे राजू भाई म्हणाले की, 'मला आता माझे कुटुंब कसे चालवायचे याची काळजी वाटते. मी गेली 10 वर्षे या ठिकाणी माझा अंड्याचा स्टॉल लावतोय पण आता काय होणार?'

विशेष म्हणजे अहमदाबाद महापालिका अंडी आणि मांसाहारी स्टॉल्सबाबत असा निर्णय घेणारी तिसरी महापालिका ठरली आहे. अहमदाबादपूर्वी, राजकोट आणि वडोदरा महानगरपालिकेने उघड्यावर अंडी आणि मांसाहारी स्टॉल्स लावण्यावर बंदी घालण्याचे फर्मान जारी केले होते. ज्यामुळे राजकीय वर्तुळातही नवीन वादाला तोंड फुटले आहे.

ahmedabad amc banned stalls selling non-veg food alongside roads in 100 m radius of schools colleges religious spots
चिकन, पुरणपोळी ते कचोरी; राज्यातील कारागृहांमधील कैद्यांना ३० हून अधिक वस्तू मिळणार

राजकोट आणि वडोदरा महानगरपालिकेने जारी केलेल्या आदेशात उघड्यावर अंडी खाणाऱ्या किंवा मांसाहारी स्टॉलवरून मांसाहार करणाऱ्यांवर देखील कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे. गुजरातच्या कायदा मंत्र्यांनी या निर्णयाचा बचाव करताना असं म्हटलं आहे की, या स्टॉलमुळे ये-जा करणाऱ्यांना वासाचा त्रास होतो.

यावर एका विक्रेत्याने असा सवाल विचारला आहे की, "आमच्यावर बंदी घालण्यात आणि हॉटेल्सना परवानगी देण्यात काय अर्थ आहे. तिथून (मांसाहारी पदार्थाचा) वास येणार नाही का?'

दरम्यान, गुजरातमधील या मुद्द्यावरुन आता राष्ट्रीय पातळीवर देखील राजकारण तापू लागलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in