Ajit Pawar: कोनशिलेवरच हसन मुश्रीफांचं नाव चुकवलं, अजित पवारांनी तर डोक्यावरच मारला हात!

Ajit Pawar: उद्घाटनाच्या कोनशिलेवर नाव चुकवल्याने अजित पवारांनी चक्क डोक्यावर हात मारुन घेतला.
Ajit Pawar: कोनशिलेवरच हसन मुश्रीफांचं नाव चुकवलं, अजित पवारांनी तर डोक्यावरच मारला हात!
ahmednagar guardian minister hasan mushrif name misspelled on cornerstone see deputy cm ajit pawar reaction

अहमदनगर: राजकीय नेत्यांचा कार्यक्रम म्हटलं की, सगळं कसं अगदी यथासांग पार पडलं पाहिजे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट डोळ्यात तेल टाकून योग्य पद्धतीने होते की नाही यासाठी अधिकारी वर्ग आणि कार्यकर्ते तत्पर असतात. पण असं असताना काही अक्षम्य अशा चुका घडतात तेव्हा मात्र, नेत्यांना देखील राहवत नाही आणि सगळ्यांसमोरच ते आयोजकांना मात्र, थेट सुनावतात. असाच काहीसा प्रकार हा सोमवार (22 नोव्हेंबर) अहमदनगरमध्ये घडला.

त्याचं झालं असं की, आपले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे एखाद्या कामबाबत किंवा एखाद्या गोष्टीसाठी किती सजग असतात हे आपण आतापर्यंत अनेकदा पाहिलं आहे. त्याचाच पुर्नप्रत्यय हा अहमदनगरमध्ये देखील आला. एका कार्यक्रमाच्या ठिकाणी उद्घाटनाच्या कोनशिलेवर असलेली एक चूक लक्षात आल्यावर अजित पवारांनी अक्षरश: आपल्या डोक्यावर हात मारुन घेतला. एवढंच नव्हे तर त्यांनी तात्काळ ती चूक निदर्शनास देखील आणून दिली.

कारण कोनशिलेवर राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्याच नावाबाबत ही चूक करण्यात आली होती. उद्घाटनासाठी जी कोनशिला बसविण्यात आली होती त्यावर हसन मुश्रीफ यांचं नाव चक्क ‘हसन मुस्त्रीफ’असं लिहिण्यात आलं होतं. ज्यामुळे अजितदादा किंचितशे संतापले. पण आयोजकांना योग्य शब्दात समज देऊन अशा चुका न करण्याचा सल्लाही त्यांनी दिली.

...म्हणून अजितदादांनी घेतला डोक्यावर हात मारून!

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत आज अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथे संत श्रेष्ठ निळोबाराय यांच्या अभंग गाथेच्या दुसर्‍या आवृत्तीचे प्रकाशन संपन्न झाले.

दरम्यान, यावेळी संत निळोबाराय यांचे निवासस्थान असलेला वाडा आणि मंदिर याचा जीर्णोद्धार होणार असल्याने या कामाचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं.

भूमिपूजनाचे औचित्य साधून प्रचलित पद्धतीप्रमाणे कोनशिलेचे अनावरण उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मान्यवरांनी केले. मात्र, कोनशीलेवर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या मुश्रीफ या नावांमध्ये झालेली शाब्दिक चूक लक्षात आल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कपाळावरच हात मारून घेतला.

या कोनशीलेवर मुश्रीफ या शब्दांऐवजी 'मुस्त्रिफ' असं लिहिण्यात आलं होतं. ही चूक अजित पवार यांनी उपस्थितांना दाखवून दिली आणि अशा चुका करत जाऊ नका. असं आपल्या खास शैलीत त्यांनी सुनावलं. त्यामुळे अजित पवारांचा चाणक्षपणा पुन्हा समोर आला.

ahmednagar guardian minister hasan mushrif name misspelled on cornerstone see deputy cm ajit pawar reaction
उपाशी विठोबा ते खुन्या मुरलीधर, पुणेकरांनी नावं ठेवताना देवांनाही सोडलं नाही-अजित पवार

यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांनाही एक प्रकारे समज दिली. त्याबद्दल उपस्थित असलेले कार्यक्रमाचे आयोजक आणि संबंधित चांगलेच चपापले. यावेळी उपस्थित असलेले राज्याचे गृहमंत्री वळसे पाटील मात्र गालातल्या गालतच हसले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in