....मुख्यमंत्र्यांच्या पुढं आमचं काही चालत नाही-अजित पवार

जाणून घ्या आणखी काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार
....मुख्यमंत्र्यांच्या पुढं आमचं काही चालत नाही-अजित पवार

'सुरूवातीपासून पाहतो आहे निवेदिकेने एवढ्यावेळा मुख्यमंत्र्यांना बसा-उठा करायला लावलं. मुख्यमंत्री उठायचे, त्यामुळे आम्हालाही उठावं लागत होतं. एकदाच सांगितलं असतं तर सगळं संपलं असतं. पण तुमच्या हातात माईक असल्याने आम्हाला काही बोलता येत नाही. अन मुख्यमंत्र्यांच्या पुढे आमचं काही चालत नाही' असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विभागातर्फे जागतिक पर्यटन दिनानिमित्त कार्यक्रमात अजित पवार यांनी मिश्किल शब्दात आपली नाराजी व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री

आणखी काय म्हणाले अजित पवार?

सर्वांगीण विकासासाठी पर्यटन ही संकल्पना हे उद्दीष्ट समोर ठेवून आजचा पर्यटन दिवस साजरा करण्यात येत आहेत. महाराष्ट्रातील अनेक फोटोग्राफर्सनी राज्यातील पर्यटनाचे छान फोटो काढले. ते फोटो पाहून महाराष्ट्रात खूप काही हे समजते. एवढी सुंदर फोटोग्राफी आहे की बोलण्यासाठी शब्द अपुरे पडतात. जे चांगलं आहे त्याचं कौतुक महाराष्ट्र कायमच करत असतो.

मुख्यमंत्रीही फोटोतले दर्दी आहेत त्यांचीही अनेक पुस्तकं आहेत. असंही अजित पवार यावेळी म्हणाले.

राज्यात मास्टर शेफ कार्यक्रम झाला यातील विजेत्यांना पारितोषक दिली पण त्यांनी थोडी तरी चव दाखवली असती तर आम्हला पटलं असतं असंही मिश्किलपणे अजित पवार म्हणाले. राज्यामध्ये पायाभूत सुविधांची निर्मिती उद्योगांमध्ये वाढ, रोजगाराची संधी, राज्याचा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक विकास अशा अनेक गोष्टी पर्यटन विकासाच्या वतीने पुढे नेणं शक्य आहे. त्यामुळे या महत्वाच्या खात्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरे, राज्यमंत्री आदिती तटकरे यांना दिल्याचे अजित पवार म्हणाले. स्वतः मुख्यमंत्री याकडे जातीने लक्ष देत आहेत.

एक चांगलं व्हिजन डोळ्यासमोर ठेवून सगळे काम करत आहेत. ही चांगली गोष्ट आहे असंही अजित पवार यावेळी म्हणाले.

चिपी विमानतळ सुरू होणार आहे हे जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेक मीम्स आणि इतर गोष्टी फिरत आहेत ते वाचूनही अनेकांना कोकण पाहण्याची इच्छा झाली आहे. ते लोकही कोकणात येतील अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही. साहसी पर्यटन धोरणालाही आपण मान्यता दिली आहे. महाबळेश्वरमध्येही सुंदर पर्यटनाचा प्लान आदित्य ठाकरेंनी तयार केला आहे. आपल्याकडे सर्वात जास्त गड-किल्ले आहेत. त्यांचं संवर्धन आवश्यक आहे.

जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने पर्यटनाला प्रोत्साहन देतो आहोत. पण कुठल्याही पक्षाच्या राजकीय पर्यटनाला आम्ही संमती दिलेली नाही असंही अजित पवार म्हणाले.

Related Stories

No stories found.