Amravati Riot : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्या आठ जणांवर गुन्हे दाखल

संचारबंदीचं उल्लंघन करणाऱ्या लोकांवरही पोलीस कारवाई
Amravati Riot : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्या आठ जणांवर गुन्हे दाखल

अमरावतीत झालेल्या दंगलीनंतर अजुनही शहरात तणावपूर्वक वातावरण आहे. या घटनेचे पडसाद अकोला शहरातही पहायला मिळाले. अकोला आणि अकोट शहरात संचारबंदीदरम्यान सोशल मीडियावरुन आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्या आठ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. याशिवाय संचारबंदीचं उल्लंघन करणाऱ्या लोकांनाही पोलीस कारवाईला सामोरं जावं लागलं आहे.

पोलीस आणि प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार अकोला शहरामध्ये संचारबंदी उल्लंघन करणाऱ्या लोकांवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. तसेच शांततेचा भंग करणाऱ्या लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रीया सुरु आहे.

सध्या अकोल्यामध्ये सकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत जमावबंदीचे आदेश तर रात्री नऊ नंतर सकाळी सहा वाजेपर्यंत रात्रीचा करते चे आदेश संपूर्ण जिल्ह्यामध्ये लागू करण्यात आलेले आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in