Alia Bhatt-Ranbir Kapoor: आलिया भट आणि रणबीर कपूर शोधतायेत लग्नासाठी 'खास' ठिकाण?

Alia Bhatt and Ranbir Kapoor looking for wedding venue: आलिया भट आणि रणबीर कपूर आपल्या लग्नासाठी काही खास ठिकाणं शोधत असल्याची सध्या जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.
Alia Bhatt-Ranbir Kapoor: आलिया भट आणि रणबीर कपूर शोधतायेत लग्नासाठी 'खास' ठिकाण?
Alia Bhatt and Ranveer Kapoor spotted in Jodhpur Looking for wedding venue(फाइल फोटो)

जोधपूर: लग्नसराई आता हळूहळू जवळ येत आहे आणि अशावेळी बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेलं जोडपं हे आता आपल्या लग्नासाठी खास जागा निवडत असल्याचं समोर आलं आहे. बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्री आलिया भट्ट आणि देखणा अभिनेता रणबीर कपूर हे लवकरच लग्नाच्या बेडीत अडकण्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

हे दोघेही नुकतेच जोधपूरमध्ये एकत्र दिसून आले. आता त्यांचे फोटो समोर आल्यानंतर अशी चर्चा आहे की, हे दोघेही आपल्या लग्नासाठी 'वेडिंग व्हेन्यू' शोधत आहेत. सोशल मीडियावर एक पोस्ट खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये आलिया आणि रणबीर एकत्र दिसत आहेत.

रणबीर कपूर याचा उद्या (28 सप्टेंबर) वाढदिवस आहे. याच निमित्ताने रणबीर आणि आलिया हे सेलिब्रेशनसाठी जोधपूरला पोहोचले आहेत. पण या सरप्राईज ट्रिप व्यतिरिक्त आणखी एक मोठी चर्चा देखील बी टाऊनमध्ये सुरु आहे. ती म्हणजे आलिया आणि रणबीर हे जोधपूरमध्येच त्यांच्या लग्नासाठी काही खास ठिकाणं पाहत आहेत.

जोधपूरमधील त्या दोघांचे फोटो हे सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल हात आहेत. या फोटोमध्ये आलियाने टाय-डाय ग्रीन डेनिम जॅकेट आणि जीन्स परिधान केलेली आहे तर रणबीर हा कॅज्युअल आउटफिटमध्ये आहे. एअरपोर्टहून बाहेर पडताना हे जोडपं कॅमेऱ्यात कैद झालं आणि त्यानंतर त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

रणबीर आपला 39 वा वाढदिवस 28 सप्टेंबरला साजरा करणार आहे. अशावेळी बर्थडेच्या आधी दोघेही जोधपूरमध्ये स्पेशल सेलिब्रेशनसाठी आले आहेत. तसंच लग्नासाठी खास ठिकाण देखील हे दोघं शोधत असल्याची चर्चा आहे. पण याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

मागील वर्षी रणबीरने आपला वाढदिवस आपल्या कुटुंबीयांसोबतच साजरा केला होता. पण आता मात्र रणबीर आपल्या खास मैत्रिणीसोबत यंदाचा बर्थडे सेलिब्रेट करण्याच्या मूडमध्ये आङे.

दरम्यान, लग्नाबाबत रणबीरने एका इंटरव्ह्यूमध्ये असं म्हटलं होतं की, 'जर कोरोना नसता तर लग्नं कधीच पार पडलं असतं. आता मी याबाबत काहीही बोलून मला त्या गोष्टीला नजर लागू द्यायची नाही. मी माझ्या आयुष्यातील ते ध्येय लवकरच पूर्ण करायचं आहे.'

Alia Bhatt and Ranveer Kapoor spotted in Jodhpur Looking for wedding venue
'विचार केला नव्हता अशा परिस्थितीतून जावं लागतंय'; आलिया भट्टची पोस्ट व्हायरल

रणबीरच्या या वक्तव्यानंतर आलियासोबत त्याचं लग्न होणार अशा बातम्यांनी बराच जोर धरला होता. पण दोघांनीही याबाबत काहीही भाष्य केलं नाही. त्यामुळे आता हे जोडपं जोधपूरमध्ये 'वेडिंग व्हेन्यू' पाहण्यासाठी गेल्याची चर्चा किती खरी ठरते याकडे त्यांच्या चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

Related Stories

No stories found.