Big News! नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून राज्यातील सर्व मंदिरं, धार्मिक स्थळं खुली होणार!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला निर्णय
Big News! नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून राज्यातील सर्व मंदिरं, धार्मिक स्थळं खुली होणार!

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महराष्ट्रात बंद करण्यात आलेली मंदिरं आणि सर्व धार्मिक स्थळं नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच 7 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आरोग्य नियमांचं काटेकोर पालन केलं जावं, अकारण गर्दी करू नये हे आवाहन करण्यात आलं आहे. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले?

कोरोनच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता तिसऱ्या संभाव्य कोरोनाच्या लाटेशी लढण्याचे नियोजन आपण केलं आहे. हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत आपण निर्बंध शिथील करत आहोत. सध्या कोरोना रूग्णांच्या संख्येत उतार येत असला तरीही आपल्याला सावधगिरी बाळगावी लागेल. धार्मिक स्थळं भक्तांसाठी खुली केली असती तरी त्या ठिकाणी आरोग्याच्या नियमांचं पालन झालं पाहिजे. चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशक वापर हा झालाच पाहिजे. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची यामध्ये मोठी जबाबदारी आहे हे विसरू नये असंही सरकारने म्हटलं आहे.

Big News! नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून राज्यातील सर्व मंदिरं, धार्मिक स्थळं खुली होणार!
BJP protest : भाजपचा ठाकरे सरकारविरोधात शंखनाद! मंदिरं उघडा मागणी करत भाजप कार्यकर्ते रस्त्यावर

भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विरोधात आणि महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात शंखनाद आंदोलन केलं होतं. तसंच मनसेनेही आंदोलन करत मंदिरं उघडण्याची मागणी केली होती. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिरं नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून उघडण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आजच शिक्षण विभागाने राज्यातल्या शाळा सुरू करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यापाठोपाठ आता मंदिरं आणि धार्मिक स्थळं उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

महाराष्ट्रात हॉटेल्स, बार, रेस्तराँ, दारूची दुकानं, मॉल्स हे सगळं सुरू करण्यात आलं होतं. मात्र मंदिरं बंद ठेवण्यात आली होती. धार्मिक स्थळं बंद होती. त्यामुळे विरोधकांसह सामान्य जनतेतही राज्य सरकारविरोधात नाराजी वाढत होती. भाजप, मनसे यांच्यासह अनेक संघटनांनी घंटानाद आंदोलन केली होती. तरीही राज्य सरकारने मंदिरं सुरू करण्याचा निर्णय घेतला नव्हता. गणेशोत्सव काळातही मंदिरं बंदच होती. गणेशोत्सवाच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर आता धार्मिक स्थळं सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी समाधान व्यक्त केलं आहे.

Related Stories

No stories found.