'आम्हाला नक्षली होण्याची परवानगी द्या', 50 उद्विग्न शेतकऱ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र

'आम्हाला नक्षली होण्याची परवानगी द्या', 50 उद्विग्न शेतकऱ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.twitter

ज्ञानेश्वर पाटील, प्रतिनिधी

सेनगाव तालुक्यातील टाकतोडा गावातील 50 शेतकऱ्यांनी नक्षलवादी होण्याची परवानगी मुख्यमंत्री यांच्याकडे मागितली आहे. असं निवेदन त्यांनी सेनगाव तहसीलदार यांच्याकडे दिलं आहे. जो पर्यंत मागणी मान्य होत नाही तो पर्यंत गावामध्ये बॅनर लावून उपोषण करणार असल्याचे शेतकऱ्यांनी त्यांच्या निवेदनात म्हटल आहे..

काय लिहिलं शेतकऱ्यांनी निवेदनात..

यावर्षी अवकाळी पावसाने सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झाले आहे. कपाशी,तूर आदी पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी पूर्ण उध्वस्त झाले आहेत. आता रब्बीचा हंगाम सुरु होताच विद्युत महावितरण कंपनीने कुठलीही नोटीस न बजावता शेतातील वीज बंद केली आहे. शेतकरी बिलाची अर्धी रक्कम भरण्यास तयार असूनही अधिकारी वीज जोडणी करायला तयार नाहीत. त्यामुळे पिकांना पाणी मिळत नसल्यामुळे रब्बी हंगामात देखील उत्पन्न मिळेल अशी आशा दिसत नाहीये .

जगायचं कसं? हा प्रश्न आमच्यासमोर उभा राहीला आहे.त्यामुळे आम्हाला मुला बाळांसहीत नक्षलवादी होण्याची परवानगी दयावी.अशी मागणी शेतकर्यांनी निवेदनातून केली आहे. जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तो पर्यंत गावामध्ये बॅनर लावून उपोषण करणार असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in