Amit Shah यांच्यावर अरविंद सावंतांची बोचरी टीका; शाह हे भाजपचे गजनी

अमित शाह यांना गजनी रोग जडला असल्याचं केलं वक्तव्य
Amit Shah यांच्यावर अरविंद सावंतांची बोचरी टीका; शाह हे भाजपचे गजनी

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची तुलना शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी गजनीशी केली आहे. गजनी सिनेमात ज्याप्रमाणे आमिर खानला काही लक्षात राहात नाही त्याला शॉर्ट टर्म मेमरी लॉस हा आजार जडलेला असतो तसा आजार अमित शाह यांना जडला आहे त्यांना गजनीसारखा झटका येतो असाच त्यांच्या बोलण्याचा संदर्भ आहे. आता यावरून शिवसेना आणि भाजप यांच्यात नवा वाद रंगण्याची चिन्हं आहेत.

माथेरान नगरपरिषदेतील कर्मचारी वर्गाने शिवसेना प्रणित भारतीय कामगार सेनेच्या कामगार युनियनमध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमाला अरविंद सावंत हजर होते. यावेळी त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

फोटो-इंडिया टुडे

काय म्हणाले अरविंद सावंत?

'मैने ऐसा कोई बोला नही था' असं जेव्हा अमित शाह म्हणतात तेव्हा त्यांना गजनीचा झटका येतो. अमित शाह गजनी असतील पण उद्धवजी मात्र रामशास्त्री बाण्याने काम करत आहेत हे लक्षात ठेवा असं म्हणत अरविंद सावंत यांनी अमित शाह यांच्यावर टीका केली आहे. शिवसेना आणि भाजपच्या युतीमधे भाजपने दिलेला शब्द पाळला नाही हेच अरविंद सावंत यांना यातून सांगायचं होतं.

2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी उद्धव ठाकरे, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली होती. त्यापैकी अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली होती. या चर्चेत मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्षे वाटून घ्यायचं असं ठरलं होतं असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.

Amit Shah यांच्यावर अरविंद सावंतांची बोचरी टीका; शाह हे भाजपचे गजनी
महाराष्ट्राचं सहकार क्षेत्र लेचंपेचं नाही, कुणीही आलं अन् मोडून काढलं; उद्धव ठाकरेंचा अमित शाह यांना टोला?

तर अमित शाह यांनी असं काही ठरलं नसल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर अनेकदा म्हटलं. 2019 च्या विधानसभा निवडणुका पार पडल्या त्यावेळीही भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षांनी महायुती म्हणून निवडणूक लढवली होती. मात्र या मुख्यमंत्रीपदावरून दोन्ही पक्षांचं भांडण झालं, विकोपाला गेलं आणि शेवटी युती तुटली. त्यानंतर शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत जात सत्ता काबीज केली.

महाविकास आघाडीचा अभूतपूर्व प्रयोग महाराष्ट्रात झाला. हा प्रयोग करण्यामध्ये दोन नेत्यांचा महत्त्वाचा वाटा होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत. जेव्हा महाविकास आघाडी स्थापन करण्याचा निर्णय झाला तेव्हा शिवसेना NDA मधूनही बाहेर पडली. आता आज याच सगळ्या बाबत भाष्य करताना लक्षात अमित शाह यांच्या राहात नाही कारण त्यांना गजनी चा झटका येतो असं म्हणत अरविंद सावंत यांनी टीका केली आहे. याला भाजपचे नेते कसं उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Related Stories

No stories found.