'अमोल कोल्हेंना मीच शरद पवारांकडे घेऊन गेलो होतो'; अजित पवार, रोहित पवारांकडून पाठराखण
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे.

'अमोल कोल्हेंना मीच शरद पवारांकडे घेऊन गेलो होतो'; अजित पवार, रोहित पवारांकडून पाठराखण

खासदार अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका साकारल्यावरून होतेय टीका; रोहित पवारांनीही मांडलं मत

राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका साकाल्यावरून वाद निर्माण झाला आहे. नथुराम गोडसेची भूमिका करण्यावरून अमोल कोल्हे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसवरही टीका होत आहे. या वादावर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह पक्षातील नेत्यांनी वेगवेगळी मतं मांडली असून, आता उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी वादाबद्दल त्यांची भूमिका स्पष्ट केली.

पुण्यात माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी अमोल कोल्हेंनी नथुराम गोडसे यांची भूमिका साकारण्यावरून सुरू झालेल्या वादावर भाष्य केलं. 'मी अमोल कोल्हे यांच्याशी चर्चा केली होती. मीच त्यांना शरद पवार यांच्याकडे घेउन गेलो होतो,' असं अजित पवारांनी सांगितलं.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे.
छत्रपती संभाजीराजेंची भूमिका साकारणारे अमोल कोल्हे 'नथुराम गोडसे' का झाले?

'२०१९ ला अमोल कोल्हे निवडणूक लढले. त्यांनी ती भूमिका २०१७ मध्ये केली. त्याला आक्षेप घेण्यात अर्थ नाही. त्यामुळे कुणी पक्षात येण्याअगोदर काय केलं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. अशा अनेकांनी भूमिका केल्या आहेत. शरद पवार अन् जितेंद्र आव्हाड यांनी त्यांची भूमिका मांडली. मी माझी भूमिका मांडली. जुन्या गोष्टी काढण्यात अर्थ नाही. त्याने एक कलावंत म्हणून ऑफर स्वीकारली होती. पुरोगामी विचार स्वीकारून डॉ. अमोल कोल्हे राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत', अशी पाठराखण अजित पवार यांनी केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे.
पुणे: 'मी पण नथुराम झालो होतो', नाना पाटेकरांकडून अमोल कोल्हेंची पाठराखण

... तर आम्ही चित्रपटाला विरोध करू -रोहित पवार

रोहित पवार यांनीही या वादावर आपलं मत मांडलं आहे. 'एक कलाकार म्हणून आपण त्यांच्यावर टीका करणे योग्य नाही. अनेक कलाकार आहेत की, त्यातले अनेक भाजपशी निगडित आहेत. त्यांनीही अशाच वादग्रस्त भूमिका केल्या आहेत. ते चित्रपटही तपासावे लागतील. चित्रपट प्रदर्शित अजून झालेला नाही. तो प्रदर्शित झाल्यानंतर त्या चित्रपटात समाज किंवा चांगल्या विचारांच्या विरोधात काही दाखवले असेल, तर आही चित्रपटाला निश्चितच विरोध करू,' असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.