'मेंटल अमोल मिटकरी'; राजू पाटील यांचा 'त्या' विधानावरून पलटवार

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंबद्दल केलेल्या टीकेला प्रत्युत्तर...
'मेंटल अमोल मिटकरी'; राजू पाटील यांचा 'त्या' विधानावरून पलटवार

राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली. राज ठाकरेंचा उल्लेख त्यांनी खाज ठाकरे असा केला. त्यानंतर सांगली येथील सभेत भाषणा दरम्यान त्यांनी ब्राह्मण समाजाचा अपमान केल्याचा आरोप करत ब्राम्हण समाजाने देखील त्यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. आता मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मेंटल मिटकरींबद्दल काय बोलणार असं म्हणत त्यांची खिल्ली उडवली आहे.

'मेंटल अमोल मिटकरी'; राजू पाटील यांचा 'त्या' विधानावरून पलटवार
आमदार अमोल मिटकरी हिंदू समाजाची माफी मागा, ब्राह्मण समाज समितीची एकमुखी मागणी

त्यानंतर आता मनसेनेही अमोल मिटकरींवर टीका केली आहे. मनसे आमदार राजू पाटील यानी आज कल्याणमध्ये अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल बोलताना त्या मेंटल माणसाबद्दल काय बोलायचं, आज शरद पवार यांनी देखील मिटकरी यांच्या वक्तव्या बाबत बोलताना तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे असं सांगितलं. मात्र एकूणच तुम्ही तुमच्या गोष्टी वदवायला तुमचं व्यासपीठ उपलब्ध करून देता. मिटकरींनी हे विसरू नये की लोकं मूर्ख नाहीत.

भोंग्यांचा मुद्दा आम्ही सामाजिक विषय म्हणूनच घेतला आहे. राज ठाकरे हे असंच म्हणाले आहेत की कोणत्याही धर्माचे असलात तरीही तुमचा धर्म तुमच्या घरी ठेवा. मिटकरी फिटकरी यांच्याबद्दल बोलणं म्हणजे आम्हाला लाजल्यासारखं होतं मूर्खांबद्दल काय बोलणार असंही राजू पाटील यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले होते मिटकरी?

सांगलीतील इस्लामपूरच्या सभेत बोलताना अमोल मिटकरी म्हणाले होती की खाजसाहेब वाढत्या महागाईवर बोलत नाहीत. पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर वाढलेत त्यावर बोलत नाहीत. नकला करतात. चांगला टाइमपास होतो. ते शरद पवार साहेबांविषयी बोलले म्हणून खाजसाहेब बोललो. निसर्गाने आम्हालाही दोन हात-दोन पाय, डोकं आणि त्यात मेंदूही दिला आहे. पण मेंदू कुणाचा गुलाम ठेवावा याचं भानही दिलंय असं अमोल मिटकरी म्हणाले होते. त्यानंतर मनसेने त्यांच्यावर टीका केली आहे.

संदीप देशपांडे काय म्हणाले?

राष्ट्रवादीच्या गॅस वर तयार झालेल्या मटण करींनी जरा सांभाळून, ही मटण करी आमचे महाराष्ट्र सैनिक कधी संपवून टाकतील ते कळणार पण नाही. तेंव्हा चड्डीत राहायचं काय समजलं?

त्यानंतर आमदार राजू पाटील यांनी अमोल मिटकरींना मेंटल मिटकरी म्हणत त्यांची खिल्ली उडवली आहे.

Related Stories

No stories found.