Mlc election 2023 : जायंट किलर पाटील विरुद्ध लिंगाडे, कुणाचं पारडं जड?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Amravati Division Graduate Constituency Legislative Council election 2023 । Ranjit Patil Vs Dhiraj Lingade : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ विधान परिषद निवडणुकीसाठी 30 जानेवारी रोजी मतदान होत आहे. शनिवारी प्रचार तोफा थंडावल्या असल्या, तरी मतं वळण्यासाठी सर्वच उमेदवारांकडून छुप्या पद्धतीने प्रयत्न सुरू आहेत. अमरावतीत लक्षवेधून घेणाऱ्या घडामोडी घडल्या. त्यामुळे जायंट किलर रणजित पाटील (Ranjit Patil) जिंकणार की, धीरज लिंगाडे (Dhiraj Lingade) गुलाल उधळणार याची उत्सुकता आहे.

अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ विधान परिषद निवडणुकीत भाजपचे रणजित पाटील विरुद्ध महाविकास आघाडी पुरस्कृत काँग्रेसचे धीरज लिंगाडे यांच्यात लढत दिसत असली, तरी यात वंचित बहुजन आघाडीचे प्रा. अनिल अंमलकार, भाजपा बंडखोर शरद झांबरे (पाटील) व अरुण सरनाईक हेही मैदानात आहेत. त्यामुळे अमरावतीत पंचरंगी लढत बघायला मिळू शकते.

धीरज लिंगाडेंची ऑडिओ क्लिप, शरद झांबरेंकडून स्फोट

प्रचाराच्या अखेरच्या दिवशी म्हणजे शनिवारी (28 जानेवारी) भाजपचे बंडखोर उमेदवार शरद झांबरे यांनी एक ऑडिओ क्लिप माध्यमांना देऊन राजकीय वर्तुळात स्फोट केला. 10 जानेवारीला त्यांनी काँग्रेसचे उमेदवार धीरज लिंगाडे यांचे सोबत फोनवर केलेली ऑडिओ क्लिप समोर आणली. त्यामध्ये काँग्रेसबद्दल उमेदवार लिंगाडे यांनी मांडलेली भूमिका आहे. त्यामुळे याचा काय परिणाम निवडणुकीत होतो, हेही पाहावं लागेल.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

Satyajeet Tambe : नाशिक पदवीधर निवडणुकीत BJP कुणाच्या पाठिशी? काय ठरलं?

धीरज लिंगाडे हे शिवसेनेत होते. निवडणुकीच्या तोंडावर त्यांना पक्षात घेऊन काँग्रेसने उमेदवारी दिलेली आहे. दुसरीकडे रणजित पाटलांसाठी ही निवडणूक म्हणावी तितकी सोपी नाही. महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांच्याशी त्यांचा सामना आहे. दुसरीकडे पक्षांतर्गत नाराजी असल्याचंही बोललं जात आहे. भाजपच्याच नेत्यानं बंड करत निवडणुकीत घेतलेली उडी यामुळे डॉ. रणजीत पाटलांसमोर मोठं आव्हान आहे.

ADVERTISEMENT

रणजित पाटील असं ठरले होते जायंट किलर!

अमरावती पदवीधर मतदारसंघ कधीकाळी अभ्यासू आमदार प्रा. बी.टी. देशमुखांचा बालेकिल्ला असलेला मतदारसंघ म्हणून परिचित होता. बी.टी. देशमुख तब्बल सहावेळा येथून विजयी झालेले. मात्र, 2010 मध्ये भाजपचे रणजीत पाटील बी.टीं.ना हरवत ‘जायंट किलर’ ठरले. 2010 आणि 2016 अशा सलग दोन टर्म रणजित पाटलांनी येथील मैदान मारलंय. मात्र, तिसऱ्यांदा मैदानात उतरलेल्या रणजीत पाटलांसमोर मोठी आव्हानं आहेत.

ADVERTISEMENT

Uddhav Thackeray : ठाकरेंना धक्का! पक्ष फुटला आता पक्ष कार्यालयही गेलं!

अमरावती पदवीधर मतदारसंघ थोडक्यात माहिती

मतदारसंघातील जिल्हे : 05 – अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ

एकूण उमेदवार : 23

एकूण मतदार : 2 लाख 6 हजार 172

प्रमुख उमेदवार : डॉ. रणजित पाटील (भाजप), धीरज लिंगाडे (काँग्रेस), प्रा. अनिल अंमलकार (वंचित), शरद झांबरे (भाजप बंडखोर), अरूण सरनाईक (अपक्ष).

अमरावतीची जागा महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला आलीये. काँग्रेसकडून येथील उमेदवारीवरून मोठा घोळ घालण्यात आला. पक्षात चार-पाच ईच्छुक असताना काँग्रेसनं ऐनवेळी ठाकरे गटाच्या धीरज लिंगाडेंना उमेदवारीसाठी आयात केलं. त्यामुळे लिंगाडेंच्या उमेदवारीवरून मविआतच असमन्वयाचं मोठं आव्हान असण्याची शक्यता आहे.

डॉ. रणजित पाटलांसमोर प्रमुख आव्हान असलेल्या अपक्ष उमेदवारांमध्ये अमरावती विभागाचे शिक्षक आमदार किरण सरनाईकांचे बंधू अरूण सरनाईक अपक्ष म्हणून रिंगणात आहे. तसेच डॉ. पाटलांचे एकेकाळचे कट्टर समर्थक शरद झांबरे यांनी त्यांच्याविरोधातच शड्डू ठोकलेला आहे. भाजपच्या नाराजांचा पाठिंबा मिळण्याची अपेक्षा झांबरेंना आहे, मात्र भाजप प्रदेशाध्यक्षांनी डॉ. रणजित पाटीलच विजयी होणार दावा केला आहे.

अमरावती पदवीधर मतदारसंघाचा निकाल हा डॉ. रणजित पाटलांचं राजकीय भवितव्य निश्चित करणारा आहे. त्यामुळे 2010 मध्ये ‘जायंट किलर’ ठरलेले रणजित पाटलांसंदर्भात त्यांच्याच इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?, याचं उत्तर 2 फेब्रुवारीच्या मतमोजणीनंतरच मिळणारे आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT