#ManikeMageHithe चं हिंदी व्हर्जन घेऊन आल्या अमृता फडणवीस! तुम्ही ऐकलंत का?

कल कुछ तुफानी करते हैं चा सस्पेन्स संपला
#ManikeMageHithe चं हिंदी व्हर्जन घेऊन आल्या अमृता फडणवीस! तुम्ही ऐकलंत का?

#ManikeMageHithe अर्थात माणिकमागेहिथे हे गाणं सोशल मीडियावर तुफान लोकप्रिय झालं. एवढंच नाही तर त्याचे वेगवेगळे टीकटॉक व्हीडिओ, फेसबुक रिल्स, इंस्टा रिल्सही आले. आता या गाण्याचं हिंदी व्हर्जन गायल्या आहेत त्या गायिका आहेत अमृता फडणवीस. होय काही वेळापूर्वीच अमृता फडणवीस यांनी हे गाणं त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केलं आहे.

#ManikeMageHithe चं हे हिंदी व्हर्जन आहे असं अमृता फडणवीस यांनी स्वतःच ट्विट केलं आहे. या गाण्यामध्ये त्या रॅपही गायल्या आहेत. या गाण्याचे शब्द देव यांनी लिहिले आहेत. #AnniversarSpecail #ManikeMageHithe #Yohani #HindiVersionOfManikeMageHithe हे हॅशटॅगही अमृता फडणवीस यांनी या सोबत दिले आहे. #ManikeMageHithe या मूळ गाण्याला 5.5 मिलियन हिट्स मिळाले आहेत. हे गाणं मे महिन्यापासून सोशल मीडियावर धुमाकूळ घालतं आहे. अशात अमृता फडणवीस या गाण्याचं हिंदी व्हर्जन घेऊन आल्या आहेत.

अमृता फडणवीस यांनी यासंदर्भातला व्हीडिओ ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

सध्या सुरू असलेला राजकारणाचा ताप आणि व्याप बाजूला ठेवा, हे कूल गाणं ऐका या आशयाचा मेसेजही अमृता फडणवीस यांनी केला आहे. अमृता फडणवीस यांच्यावर नवाब मलिक यांनी काही आरोप केले होते. ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्या व्यक्तीचे कसे अमृता फडणवीस यांच्यासोबत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोटो आहेत ते त्यांनी समोर आणलं होतं. त्यानंतर अमृता फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिकांना ठोस उत्तरही दिलं होतं.

या सगळ्या घडामोडी झाल्यानंतर अमृता फडणवीस यांनी गुरूवारी एक ट्विट केलं होतं. या ट्विटमध्ये त्या म्हणाल्या होत्या की आओ कुछ तूफ़ानी करते है, कल शाम .... मी पुन्हा येत अहे !!! त्यातल्या मी पुन्हा येत आहे या वाक्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. अमृता फडणवीस आज संध्याकाळी नेमकं काय करणार? याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिली होती. अशात आता त्यांनी आपलं गाणं सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे.

अमृता फडणवीस गायिका देखील आहेत. त्यांच्या आवाजातील अनेक गाणी चाहत्यांच्या भेटीस आली होती. अमृता फडणवीस यांचे गायनकौशल्य संपूर्ण राज्याला परिचित आहे. यापूर्वीही त्यांची अनेक गाणी सोशल मीडियावर हिट ठरली आहेत. अमृता फडणवीस यांनी भाऊबीजेनिमित्त एक गाणे रिलीज केले होते.

‘तिला जगू द्या’ या गाण्याचा एक व्हिडीओ अमृता यांनी आपल्या सोशल नेटवर्किंग अकाऊंटवरुन पोस्ट केला होता. या व्हिडीओला दोन दिवसांमध्ये दहा लाख व्ह्यूज मिळाले होते. त्यांनी याआधी देखील अनेक गाणी गायली आहेत. बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्या हस्ते अमृता फडणवीस यांच्या गाण्याचा एक अल्बम देखील रिलिज झालेला आहे. यानंतर, त्यांनी ‘व्हॅलेंटाईन डे’च्या (Valentine’s day) मुहूर्तावर सोशल मीडियावर एक गाणे शेअर केले होते.

‘ये नयन डरे डरे’ असे या गाण्याचे शब्द आहेत. गणेशोत्सवादरम्यान त्यांनी गणेश वंदना देखील गायली होती. त्यामुळे जर त्यांच्या या ट्वीटचा अर्थ त्यांचे नवे गाणे असेल तर ही त्यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in