Fadnavis vs Malik: '48 तासात ट्विट डिलीट करा नाहीतर..', अमृता फडणवीसांची मलिकांना नोटीस

Amruta Fadnavis send legal notice Nawab Malik: अमृता फडणवीस यांनी नवाब मलिक यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
Fadnavis vs Malik: '48 तासात ट्विट डिलीट करा नाहीतर..', अमृता फडणवीसांची मलिकांना नोटीस
amruta fadnavis send legal notice nawab malik nilofar malik send notice devendra fadnavis drugs case

मुंबई: मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) अटक केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी याप्रकरणी अक्षरश: रान उठवलं होतं. सुरुवातीला नवाब मलिक यांचा रोख हा एनसीबीकडे होता. मात्र, हळूहळू या प्रकरणाला राजकीय वळण मिळालं. आता तर या प्रकरण थेट नवाब मलिक विरुद्ध देवेंद्र फडणवीस असंच चित्र निर्माण झालं आहे. असं असताना आता या दोन्ही नेत्यांना मानहानी केल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे.

आज (11 नोव्हेंबर) सकाळी नवाब मलिक यांच्या कन्या निलोफर मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावली होती. ज्यानंतर निलोफर मलिक यांनी असं म्हटलं आहे की, देवेंद्र फडणवीस यांनी जी विधानं केली आहेत ती मागे घेऊन क्षमा मागावी. जर त्यांनी क्षमा नाही मागितली तर त्यांच्या विरोधात फौजदारी आणि दिवाणी न्यायालयात मानहानीचा दावा दाखल करण्यात येईल.

दरम्यान, निलोफर मलिक यांनी देवेंद्र फडणवीसांना नोटीस पाठवून काही तास उलटत नाही तोच अमृता फडणवीस यांनी देखील नवाब मलिक यांना मानहानी केल्या प्रकरणी नोटीस बजावली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने राज्यात ड्रग्सचा खेळ चालू आहे. असा आरोप नवाब मलिकांनी केला होता. याच आरोपापूर्वी मलिक यांनी एक फोटो ट्वीट केला होता. त्यामध्ये अमृता फडणवीस आणि जयदीप राणा हा फोटो होता. हाच जयदीप राणा ड्रग्स पेडलर असून त्यानेच अमृता फडणवीस यांच्या अल्बमला फायनान्स केल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. याबाबत त्यांनी काही ट्वीटही केले होते.

दरम्यान, याच आरोपांबाबत अमृता फडणवीस यांनी नवाब मलिकांना नोटीस पाठवून संबंधित आरोप मागे घ्यावेत आणि ट्वीट डिलिट करावेत अशी मागणी केली आहे.

'सार्वजनिकपणे माफी मागा, नाहीतर...'

अमृता फडणवीस यांनी नवाब मलिक यांना जी नोटीस पाठवली आहे ती थेट सोशल मीडियावरच शेअर केली आहे. यावेळी त्यांनी असं म्हटलं आहे की, 'पुढील 48 तासात मानहानीकारक आणि दिशाभूल करणारे ट्विट डिलीट करा. याबाबत सार्वजनिकपणे माफी मागा. नाहीतर मानहानीच्या खटल्याला सामोरे जा.' असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं आहे.

amruta fadnavis send legal notice nawab malik nilofar malik send notice devendra fadnavis drugs case
'...तेव्हा स्त्रीच्या चारित्र्याची हत्या केली जाते', कॉस्मेटिक सर्जरीच्या आरोपाला अमृता फडणवीसांचं 'हे' उत्तर

दरम्यान, आता याबाबत दोन्ही नेते नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही नेते हे एकमेकांवर अत्यंत गंभीर आरोप करत आहेत. त्यामुळेच आता या सगळ्या प्रकरणातून नेमकं काय बाहेर पडणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in