'महाविकास नाही महाकेऑस आघाडी', वाईन विक्रीवरून अमृता फडणवीस यांचा सरकारवर निशाणा

जाणून घ्या नेमकं काय म्हणाल्या आहेत अमृता फडणवीस?
'महाविकास नाही महाकेऑस आघाडी', वाईन विक्रीवरून अमृता फडणवीस यांचा सरकारवर निशाणा

'वाईन ही दारू असून ती सुपरमार्केट किंवा किराणा दुकानात ठेवण्याची गरज नाही. तिथे लहान मुलं चॉकलेट घ्यायला जातात, महिला रेशन घेण्यासाठी जातात. दुकानात वाईनला परवाना देऊन काही विशिष्ट लोकांचा फायदा पाहिला जातो आहे. ही महाविकास नाही तर महाकेऑस आघाडी आहे.' असं म्हणत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. लोणावळा येथील एका कार्यक्रमात त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला त्यावेळी त्यांनी हे उत्तर दिलं आहे.

आणखी काय म्हणाल्या अमृता फडणवीस?

विद्यार्थी, एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न राज्यसरकार दुर्लक्षित करत आहे. काही मूठभर लोकांच्या फायद्यासाठी हे सरकार झटत आहे. आजची परिस्थिती विद्यार्थ्यांवर यायला नको होती. दुकानात वाइनला परवाना देऊन शेतकऱ्यांच्या नावाने काही लोकांचा फायदा केला जातोय. हे अयोग्य आहे. नागपूर सारख्या शहरात सुपर मार्केट असोसिएशन वाइन ठेवणार नाही असं म्हणत आहे. असंही अमृता फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

त्या पुढे म्हणाल्या की, 'जे जागरूक नागरिक आहेत ते यापासून लांब राहतील. शेवटी वाइन ही दारूच आहे. सुपर मार्केटमध्ये लहान मूलं, महिला येतात. तिथं वाइनची गरज नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आहे. त्यामधील अर्ध्या नेत्यांना माहिती नसतं नेमकं की महाराष्ट्रात काय सुरू आहे' असं म्हणत अमृता फडणवीस यांनी इथल्या कारभारावरही निशाणा साधला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in