"उद्ध्वस्त ठ....ने कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र आमचा?" अमृता फडणवीस यांचा खोचक सवाल

उद्धव ठाकरेंच्या विरोधात अमृता फडणवीस यांचं खोचक ट्विट
"उद्ध्वस्त ठ....ने कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र आमचा?" अमृता फडणवीस यांचा खोचक सवाल

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात दोन ट्विट केली आहेत. सध्या महाराष्ट्रात जे काही चाललं आहे त्या परिस्थितीवरून हे दोन ट्विट केले आहेत. २०१४ च्या निवडणुकीच्या वेळी कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा ही भाजपची टॅगलाईन होती. त्याच टॅगलाईनवर आधारित टीका अमृता फडणवीस यांनी केली आहे.

काय आहे अमृता फडणवीस यांचं पहिलं ट्विट?

थोडक्यात उत्तर द्यावे;

(उत्तर दिलेल्या विकल्पांमधूनच एक किंवा सर्व पर्याय निवडून धावे)

उद्वस्थ ठ_ _ ने कुठे नेवुन ठेवला आहे #Maharashtra आमचा ?

1 वसुलीच्या ताब्यात

२ विकृत अघाडीच्या ताब्यात

३ लोड shedding च्या ताब्यात

४ Traffic Jam आणि अव्यवस्थेच्या ताब्यात

५ गुंडांच्या ताब्यात

काय आहे अमृता फडणवीस यांचं दुसरं ट्विट?

बाळा साहेब के नाम पे करते सभी अब रास लीला है,

मैं करूँ तो साला, character ढीला है !

असे दोन ट्विट करत अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्रात आणि खास करून मुंबईत हनुमान चालीसा हा विषय चांगलाच गाजतो आहे. अपक्ष आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी मुंबईत दाखल होत आपण मातोश्रीसमोर हनुमान चालीसा म्हणणारच असा इशारा दिला होता. त्यानुसार ते मुंबईत आले. त्यांनी शनिवारी त्यांचा निश्चय मागेही घेतला. त्यानंतर त्यांना अटकही झाली. आज त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

हे सगळं प्रकरण गाजत असतानाच रात्रीच किरीट सोमय्यांच्या कारवरही हल्ला झाला. त्यावरून देवेंद्र फडणवीस यांनीही सरकारवर टीका केली आहे. अशात आता अमृता फडणवीस यांनी सरकारविरोधात ट्विट केलं आहे.

या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर आता अमृता फडणवीस यांनी केलेलं ट्वीट देखील चर्चेत आलं आहे. “बाळासाहेब के नाम पे करते सभी अब रास लीला है, मैं करूं तो साला, कॅरेक्टर ढीला है”, असं ट्वीट अमृता फडणवीस यांनी केलं आहे.

मुळात काय घडलं होतं?

अमृता फडणवीस यांनी शनिवारी रात्री केलेलं एक ट्विट करून पुन्हा डिलिट केलं. त्यावरून ट्विटरवर मुद्दा उपस्थित करण्यात आल्यानंतर त्यावर त्यांनी हे ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे.

ट्विट केलं आणि डिलीटही केलं!

अमृता फडणवीस यांनी शनिवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास एक ट्विट केलं होतं. यामध्ये “उध्वस्त ठरकीने कुठे नेऊन ठेवला आहे आमचा महाराष्ट्र?” असा खोचक सवाल केला होता. त्याखाली #Maharashtraunderattack असा हॅशटॅग देखील त्यांनी दिला होता. मात्र, यानंतर काही वेळातच त्यांनी हे ट्विट डिलिट करत दुसरं ट्विट केलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in