Anandrao Adsul case : रवी राणांनी उद्धव ठाकरेंचं नाव घेत केला गंभीर आरोप
आमदार रवि राणा आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.

Anandrao Adsul case : रवी राणांनी उद्धव ठाकरेंचं नाव घेत केला गंभीर आरोप

"आनंदराव अडसुळांनी कर्जाच्या मोबदल्यात २० टक्के कमिशन घेतलं आणि मराठी खातेदारांची फसवणूक केली"

शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसुळ यांच्यावर सिटी को-ऑपरेटिव बँक प्रकरणात ईडीने कारवाई केली. अडसुळ यांच्या राहत्या घरावर ईडीने छापा टाकला. या कारवाईचं आमदार रवि राणा यांनी स्वागत केलं आहे. तसेच उद्धव ठाकरे यांचं नाव घेत राणांनी गंभीर आरोप केला आहे.

आमदार रवि राणा यांनी व्हिडीओतून आपलं म्हणणं मांडलं आहे. 'आज सकाळी माजी खासदार आनंदराव अडसुळ यांच्या कांदिवलीतील राहत्या घरी ईडीने कारवाई केली. माध्यमांतून ही माहिती मला मिळाली. सिटी को-ऑपरेटीव बँकेच्या मुंबईत १४ शाखा आहेत. त्या बँकेचे खातेदार मुंबईतील मराठी बांधव आहे. त्यात गिरणी कामगार आहेत. डब्बेवाले कामगार आहे. या सगळ्यांनी सिटी बँकेत आपल्या ठेवी ठेवल्या होत्या. यात मग कुणी लग्नकार्यासाठी, कुणी आजारासाठी, तर काहींनी अडचणीच्या काळात वापरायला येतील म्हणून हे पैसे ठेवलेले होते. पण, तीन वर्षांपूर्वी सिटी को-ऑपरेटिव बँक बुडाली', असं राणा म्हणाले.

'बँक अचानक बंद झाली. सगळ्यांना मिळणारे पैसे बंद झाले. लोकांनी बँकेच्या चकरा मारल्या. आंदोलनं केली. आर्थिक गुन्हे शाखेत, स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली. या बँकेचे चेअरमन आनंदराव अडसुळ आहेत. त्या बँकेत ९८० कोटी रुपयांच्या ठेवी होत्या. बँकेत ९ हजार खातेदार होते. यात ९० टक्के मराठी खातेदार होते. त्या सगळ्यांची फसवणूक केली', असा आरोप राणा यांनी केली आहे.

'ज्यांची एक कोटीची प्रॉपर्टी आहे अशा बिल्डरांना पाच कोटींचं कर्ज दिलं. ज्यांची पाच कोटींची प्रॉपर्टी आहे, त्यांना २० कोटींचं कर्ज दिलं. हे कर्ज देण्याच्या मोबदल्यात त्यांच्याकडून २० टक्के कमिशन घेतलं. त्यानंतर ही बँक बुडाली. ज्या बँकेच्या मुंबईत १४ शाखा आहेत. पाच-सहा शाखेच्या प्रॉपर्टी या अडसुळ यांचा मुलगा आणि जावयाच्या नावावर आहेत. त्या बँकेला भाडेतत्वावर दिल्या', असा गंभीर आरोप राणा यांनी केला आहे.

आमदार रवि राणा आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.
Co-operative Bank Fraud Case: ईडीच्या कारवाईदरम्यान शिवसेना नेते आनंदराव अडसुळांची प्रकृती बिघडली

'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्यानं याप्रकरणात कारवाई झाली नाही. कोणत्याही प्रकारे विरोधी कारवाई झाली नाही. ती फाईल बंद करण्यात आली. प्रलंबित ठेवण्यात आली. त्या सर्व खातेदारांनी माझ्यासोबत येऊन ईडीच्या कार्यालयात तक्रार दिली होती. पैसे बुडालेल्या खातेदारांचे जबाब ईडीने नोंदवली आणि आज त्या प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे. बँक बुडाली म्हणून १०-१५ लोक मरण पावले आहेत. त्यांची ही स्थिती आनंदराव अडसुळ यांनी करुन ठेवली आहे. त्यामुळे ईडीची कारवाई अत्यंत योग्य आहे. अडसुळांवर कारवाई झाली पाहिजे आणि मराठी खातेदारांना न्याय मिळाला पाहिजे. आर्थिक गुन्हे शाखेने मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळे फाईल बाजूला ठेवली आहे. त्यामुळे ईडीच्या कारवाईचं मी स्वागत करतो', असं राणा म्हणाले.

Related Stories

No stories found.