Anil Deshmukh Case: CBI ने मुख्य सचिव सीताराम कुंटे, DGP संजय पांडेंना का बजावलंय समन्स?

Anil Deshmukh case: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सुरु असलेल्या तपास प्रकरणी सीबीआयने राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना समन्स बजावलं आहे.
Anil Deshmukh Case: CBI ने मुख्य सचिव सीताराम कुंटे, DGP संजय पांडेंना का बजावलंय समन्स?
Anil Deshmukh case: CBI summoned chief secretary sitaram kunte and DGP sanjay pandey

मुंबई: महाराष्ट्राचे (Maharashtra) माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याविरुद्ध पोलिसांच्या बदल्या, पोस्टिंग रॅकेट आणि 100 कोटींच्या वसुलीच्या आरोपानंतर त्यांच्याविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांनी चौकशी सुरु केली आहे. दरम्यान, अनिल देशमुख यांच्या केसशी संबंधित प्रकरणी आता CBI ने महाराष्ट्राचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक (DGP) संजय पांडे यांना समन्स पाठवलं आहे.

यावेळी सीताराम कुंटे आणि संजय पांडे या दोन्ही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सीबीआयला कळवलं आहे की, ते सीबीआय कार्यालयात हजर राहणार नाहीत. त्यांना जी काही चौकशी करायची असेल ती त्यांनी त्यांच्या कार्यालयात येऊन करावी. दरम्यान,प्रथमच असे दिसून येत आहे की राज्याचे मुख्य सचिव आणि डीजीपी यांना सीबीआयने चौकशीसाठी बोलावले आहे.

राज्य गुप्तचर खात्याच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी काही फोन टॅपिंग करुन पोलील बदल्यांच्या रॅकेट उजेडात आणलं होतं.

ज्यावेळी रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंगद्वारे या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. त्यावेळी सीताराम कुंटे राज्याच्या गृह खात्यात ACS पदावर होते. म्हणूनच सीबीआयला या प्रकरणाच्या तपासात कुंटे यांची देखील चौकशी करायची आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचा आरोप केला होता. तेव्हापासून याप्रकरणी वेगवेगळ्या केंद्रीय तपास यंत्रणा तपास करत आहेत. सीबीआय देखील यातील एका प्रकरणाचा तपास करत आहे.

सीबीआय व्यतिरिक्त, अंमलबजावणी संचालनालय (ED) देखील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तपास करत आहे आणि आतापर्यंत अनेकदा ईडीने अनिल देशमुख यांना समन्स बजावलं आहे. मात्र, ते एकदाही चौकशीसाठी ईडीसमोर हजर राहिलेले नाही.

परमबीर सिंग गायब?

दुसरीकडे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आहेत कुठे? हा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून उपस्थित होतो आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे परमबीर सिंग गेल्या काही दिवसांपासून समोरच आलेले नाहीत. त्यांनी लेटर बॉम्ब टाकून अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती.

परमबीर सिंग यांनी अर्ज केलेली रजा संपून 30 दिवस पूर्ण झाले आहेत. पण तरीही त्यांनी मेडिकल सर्टिफिकेट देखील दिलेले नाही. त्यामुळे परमवीर सिंग यांना मेडिकल बोर्डसमोर हजर राहावे लागण्याची शक्यता आहे. असं असताना परमबीर सिंग नेमके कुठे आहेत याचा ठावठिकाणा कुणालाच लागू शकलेला नाही. त्यामुळे परमबीर सिंग नेमके आहेत कुठे? असा सवाल आता सर्वजण विचारु लागले आहेत.

दरम्यान, तपास यंत्रणांना मात्र असा संशय आहे की, परमबीर सिंग यांनी देश सोडला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त देश सोडून रशियाला गेले असावेत असं तपास यंत्रणांना वाटतं आहे. 7 एप्रिलला परमबीर सिंग हे तपास यंत्रणांसमोर हजर झाले होते. 25 फेब्रुवारीला झालेल्या अँटेलिया बॉम्ब प्रकरणात त्यांना समन्स जारी करण्यात आले होते.

Anil Deshmukh case: CBI summoned chief secretary sitaram kunte and DGP sanjay pandey
परमबीर सिंहांना वाचवणं भाजपसाठीच गरजेचं; काँग्रेसनं उपस्थित केली शंका

25 फेब्रुवारीला घडलेल्या या प्रकरणानंतर 17 मार्चला परमबीर सिंग यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून होम गार्ड्स खात्यात बदली करण्यात आली. त्यांनी या पदाचा पदभार 22 तारखेला स्वीकारलाही होता. त्यानंतर 4 मेपर्यंत ते कार्यालयात हजर राहिले. 5 मेपासून परमबीर सिंग सुट्टीवर आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in