Anil Deshmukh: 'मी सरळमार्गी आणि नैतिकतेला धरुन चालणारा माणूस..', पाहा अनिल देशमुख काय म्हणाले
anil deshmukh reaction before going to ED office parambir singh 100 crore sachin waze (फोटो सौजन्य: Facebook)

Anil Deshmukh: 'मी सरळमार्गी आणि नैतिकतेला धरुन चालणारा माणूस..', पाहा अनिल देशमुख काय म्हणाले

Anil Deshmukh: अनिल देशमुख यांनी ईडीसमोर हजर होण्यापूर्वी सोशल मीडियावर एक व्हीडिओ पोस्ट करुन आपली बाजू मांडली आहे.

मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सोमवारी (1 नोव्हेंबर) अचानक मुंबईतील ईडी कार्यालयात हजर झाले. गेले अनेक दिवस ईडीने समन्स बजावून देखील अनिल देशमुख हे ईडी समोर हजर होत नव्हते. पण आज मात्र, ते ईडीसमोर हजर झाले. मात्र, त्याआधी त्यांनी सोशल मीडियावर एक व्हीडिओ शेअर करुन आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

'मी सरळमार्गी आणि नैतिकतेला धरुन चालणारा माणूस आहे. जे देश सोडून पळून गेले ते परमबीर सिंग आणि जो तुरुंगात आहे असा सचिन वाझे या लोकांच्या आरोपावरुन माझी जी चौकशी सुरु आहे त्याचं मला दु:ख आहे.' असं अनिल देशमुख यावेळी म्हणाले आहेत.

पाहा अनिल देशमुख नेमकं काय-काय म्हणाले.

'मला जेव्हा ईडीचा समन्स आला त्यावेळेस मी ईडीला सहकार्य करत नाही अशाप्रकराच्या चुकीच्या बातम्या वर्तमान पत्रात, प्रसारमाध्यमांमध्ये आल्या. मी आपल्याला सांगू इच्छितो की, आपल्याला ज्या-ज्या वेळेस ईडीचा समन्स आला त्या-त्या वेळेस मी कळवलं की, माझी याचिका हायकोर्टामध्ये आहे. त्याची सुनावणी चालू आहे. मी सुप्रीम कोर्टात सुद्धा याचिका दाखल केली आहे. त्याचा निकाल आल्यानंतर मी स्वत: ईडीच्या ऑफिसमध्ये येईल.'

'ईडीने जेव्हा आमच्या सर्व घरावर छापे टाकले तेव्हा मी माझ्या परिवाराने माझ्या सहकाऱ्यांनी सर्वांनीच.. माझे कर्मचारी आहेत त्या सर्वांनी त्यांना सहकार्य केलं. सीबीआयचे मला दोनदा समन्स आले त्या दोन्ही समन्सला मी स्वत: सीबीआयच्या ऑफिस जाऊन मी स्वत: माझा जबाब तिथे दिला आहे. अजूनही केस सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे. पण आज मी स्वत: ईडीच्या ऑफिसमध्ये हजर झालेलो आहे.'

'आपल्याला माहिती आहे की, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माझ्यावर खोटे आरोप केले. ज्या परमबीर सिंगांनी माझ्यावर आरोप केलेत ते परमबीर सिंग आज कुठे आहेत? ज्या बातम्या वर्तमानपत्रात येत आहेत, ज्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये येत आहेत त्यानुसार परमबीर सिंग भारत सोडून पळून गेले परदेशात. अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत.'

'ज्यांनी अनिल देशमुखावर आरोप केला तोच आरोप करणारा पळून गेला. आज परमबीर सिंग विरुद्ध त्याच्याच पोलीस खात्यातील अधिकारी, अनेक व्यवसायिक यांनी अनेक पोलीस तक्रारी दाखल केल्या आहेत. तसेच त्याचा जो सहकारी होता API सचिन वाझे त्याने सुद्धा परमबीर सिंग यांच्या सांगण्यावरुन माझ्यावर आरोप केले.'

'आज सचिन वाझे खुनाच्या आरोपाखाली तुरुंगात आहे. सचिन वाझे याआधी सुद्धा तुरुंगात होता. सचिन वाझेला नोकरीतून काढण्यासाठी प्रक्रिया सुरु केल्यानंतर आणि सरकारने नोकरीतून काढल्यानंतर त्याने माझ्यावर आरोप केले आहे.'

'अशा या परमबीर सिंग आणि सचिन वाझे सारख्या लोकांच्या आरोपावरुन माझी जी चौकशी होत आहे माझ्या कुटुंबीयांना जो त्रास दिला जात आहे त्याबद्दल मला अतिशय दु:ख होत आहे.'

'मी सरळमार्गाने चालणारा, नैतिकतेला धरुन चालणारा व्यक्ती आहे. 30 वर्षात माझ्यावर एक सुद्ध आरोप या राजकीय किंवा सामाजित जीवनात लागलेला नाही. पण आज दु:खाची गोष्ट ही आहे की, परमबीर जो देश सोडून पळून गेला माझ्यावर आरोप करुन. सचिन वाझे हा तर आजही तुरुंगात आहे.'

anil deshmukh reaction before going to ED office parambir singh 100 crore sachin waze
Anil Deshmukh: मोठी बातमी.. अखेर अनिल देशमुख ED कार्यालयात दाखल, नेमकं काय घडलं?

'त्यांनी केलेल्या माझ्यावरील आरोपाची आज ईडी आणि सीबीआय चौकशी करतंय. याचं मला अतिशय दु:ख आहे.' अशा शब्दात अनिल देशमुख यांनी आपली बाजू मांडली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in