Anil Parab: 'बाळासाहेबांची, माझ्या मुलींची शपथ घेऊन सांगतो मी चूक केलेली नाही, ED चौकशीला सामोरा जातोय'
Anil Parab gives statement to media before leaving for Ed's interrogation

Anil Parab: 'बाळासाहेबांची, माझ्या मुलींची शपथ घेऊन सांगतो मी चूक केलेली नाही, ED चौकशीला सामोरा जातोय'

Anil parab statement media before leaving Ed interrogation: अनिल परब यांनी ईडी चौकशीला जाण्याआधी माध्यमांशी संवाद साधला. मी काहीही चूक केली नाही. असं त्यांनी त्यावेळी म्हटलं आहे.

मुंबई: शिवसेनेचे मंत्री अनिल परब हे 28 सप्टेंबर रोजी अंमलबजावणी संचलनालयासमोर (ED) हजर झाले आहेत. ईडीकडून अनिल परब यांना दुसरं समन्स बजावण्यात आलं होतं. ज्यानंतर अनिल परब यांनी ईडीच्या कार्यालयातून जाऊन चौकशीला सहकार करणार असल्याची भूमिका स्पष्ट केली.

दरम्यान, ईडीच्या कार्यालयात जाण्याआधी अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पुन्हा एकदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आपल्या मुलींची शपथ घेतली. 'मी काहीही चूक केलेली नाही. त्यामुळे मी ईडीच्या चौकशीला सामोरा जात आहे आणि त्यांना सहकार्य करणार आहे.' असं परब यावेळी म्हणाले.

पाहा अनिल परब नेमकं काय म्हणाले:

'मला ईडीचं दुसरं समन्स मिळालं आहे आणि मी ईडीच्या चौकशीला जात आहे. मी मागे देखील आपल्याला सांगितलं आहे की, मी शिवसेनाप्रमुखांची शपथ घेऊन आणि मी माझ्या मुलींची शपथ घेऊन सांगतो आहे की, मी असं कोणतंही चुकीचं काम केलेलं नाही. म्हणून मी आज चौकशीला सामोरं जात आहोत.'

'चौकशीत मला जे प्रश्न विचारण्यात येतील. त्याची मी उत्तरं देईन. अजूनही मला माहित नाही की, मला नेमकं कशासाठी बोलावलं आहे. पण जे प्रश्न विचारले जातील त्याची सविस्तर उत्तरं मी देईन. चौकशीला पूर्णपणे सहकार्य करण्याची माझी भूमिका आहे.'

'चौकशीसाठी मला अद्यापही कोणतं कारण हे देण्यात आलेलं नाही. पण चौकशीला गेल्यावर याबाबत काय ते कळेल. मला चौकशीला बोलावलंय, मी चौकशीला जातोय.. मला एवढं नक्की माहिती आहे की, माझ्याकडून कोणतीही चूक झालेली नाही.'

नेमकी कोणत्या प्रकरणात होऊ शकते अनिल परब यांची चौकशी?

मंत्री अनिल परब यांना ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याबाबत नोटीस पाठवली असली तरी नेमकी चौकशी कोणत्या प्रकरणात करायची आहे याबाबत काहीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे आता असा अंदाज वर्तवला जात आहे की, अनिल परब यांना बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने दिलेल्या जबाबनुसार वसुली प्रकरणात नोटीस बजावलेली असू शकते.

मात्र, असं असलं तरीही जोवर अनिल परब यांच्याकडून याबाबत अधिकृतरित्या माहिती समोर येत नाही तोवर याविषयी नेमका खुलासा होणार नाही.

Anil Parab gives statement to media before leaving for Ed's interrogation
मनी लाँडरिंग प्रकरण : अनिल परबांना नोटीस देताच ED च्या तीन ठिकाणी धाडी

शिवसेनेचे तीन नेते ईडीच्या रडारवर...

शिवसेनेचे तीन नेते सध्या ईडीच्या रडारवर असल्याचं चित्र आहे. यात राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब, खासदार भावना गवळी आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ हे आहेत. अनिल देशमुख मनी लाँडरिंग प्रकरणात सचिन वाझेकडून अनिल परब यांचं नाव आल्यानं ईडीने परब यांच्याकडे मोर्चा वळवला आहे.

परब यांच्या चौकशीकडे लक्ष लागलेलं असतानाच आता शिवसेनेच्या खासदार भावना गवळी अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण भावना गवळी यांचे सहकारी सईद खान यांना ईडीने अटक केली आहे. तर दुसरीकडे आनंदराव अडसूळ यांची देखील ईडीकडून कसून चौकशी करण्यात आली. त्यामुळे एकाच वेळी शिवसेनेचे तीन-तीन नेते हे अडचणीत आले आहेत.

Related Stories

No stories found.