Covid 19 : मुंबई कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर? दिवसभरात 2510 रूग्णांची नोंद

मुंबईत दिवसभरात 1 कोरोना मृत्यूची नोंद
Covid 19 : मुंबई कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर? दिवसभरात 2510 रूग्णांची नोंद
कोरोना रुग्णसंख्या (फाइल फोटो, सौजन्य - PTI)

मुंबईत कोरोनाच्या रूग्णांची संख्या गेल्या काही दिवसांमध्ये चांगलीच वाढते आहे. मुंबईत दिवसभरात 2510 पॉझिटिव्ह रूग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 251 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईत आत्तापर्यंत एकूण 7 लाख 48 हजार 788 बरे झाले आहेत. मुंबईतील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 97 टक्के आहे. असं सगळं असलं तरीही गेल्या काही दिवसांपासून मुंबईत वाढणारी कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या टेन्शन वाढवणारी आहे.

कोरोना रुग्णसंख्या
Arjun Kapoor : अभिनेता अर्जून कपूर कोरोना पॉझिटिव्ह, मलायकाचीही होणार चाचणी

मुंबईत कसे वाढत गेले रूग्ण पाहू

28 डिसेंबर - 1377 रूग्णांची नोंद

27 डिसेंबर - 809 रूग्णांची नोंद

26 डिसेंबर - 922 रूग्णांची नोंद

25 डिसेंबर-757 रूग्णांची नोंद

24 डिसेंबर-683 रूग्णांची नोंद

23 डिसेंबर- 602 रूग्णांची नोंद

22 डिसेंबर 490 रूग्णांची नोंद

21 डिसेंबर 327 रूग्णांची नोंद

21 ते 28 डिसेंबर या कालावधीत रूग्णसंख्या 327 वरून 1377 वर गेली आहे. तर आज दिवसभरात 2510 रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईत तिसरी लाट आली आहे का? याची चर्चा आता सुरू झाली आहे.

कोरोना रुग्णसंख्या
मुंबई : डॉ. लाल पॅथलॅबमधील 12 कर्मचारी आढळले कोरोना पॉझिटिव्ह, महापालिकेनं लॅब केली सील

मुंबईत जे कोरोना रूग्ण वाढत आहेत त्यातले बहुतांश रूग्ण हे मलबार हिल, नेपिअन सी रोड या उच्चभ्रू भागातले आहेत. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं की बुधवारी 51 हजार चाचण्या करण्यात आल्या त्यामध्ये 2200 हून जास्त रूग्ण पॉझिटिव्ह आढळले. पॉझिटिव्हिटी रेट 4 टक्के झाला आहे. तो पाच टक्के झाला तर ती धोक्याची घंटा आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

मुंबई महापालिकेच्या डी वॉर्डमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की चार ते पाच दिवसात पाच इमारती सील केल्या आहेत. दूतावास अपार्टमेंटची बी विंग आणि नेपेनसी रोड येथील दर्या महलची ए विंग सील करण्यात आलेल्या इमारतींमध्ये आहेत. दूतावास अपार्टमेंटमध्ये गेल्या दोन दिवसांत 13 प्रकरणे नोंदवली गेली आहेत त्यापैकी 11 प्रकरणे बी विंगमधून आणि उर्वरित ए विंगमधून नोंदवली गेली आहेत. व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी इमारती सील केल्या जात आहेत. मंगळवारी दूतावास अपार्टमेंटमध्ये 5 जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली होती, त्यानंतर संपूर्ण इमारतीत चाचणी घेण्यात आली आणि आणखी 8 जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली.

(फोटो सौजन्य: Jaison G)

वर्षाच्या सुरुवातीला तिसरी लाट येण्याची शक्यता?

राष्ट्रीय कोव्हिड-19 सुपरमॉडेल समितीचे सदस्य विद्यासागर यांनी एएनआयला सांगितले की, 'पुढील वर्षाच्या सुरुवातीला भारतात तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. तथापि, लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतिकारशक्ती निर्माण झाल्यामुळे ती दुसऱ्या लाटेपेक्षा काहीशी कमकुवत असेल, परंतु तिसरी लाट नक्कीच येईल.'

'एप्रिल-मेमध्ये दुसऱ्या लाटेतील रुग्णांच्या तुलनेत तिसऱ्या लाटेत त्याची संख्या कमी असेल. सरकारने 1 मार्चपासून भारतात लसीकरण सुरू केले होते. डेल्टा व्हेरिएंट देखील याच वेळेस भारतात आला होता. त्यावेळी फ्रंटलाईन वर्कर्स वगळता कोणालाही लस देण्यात आली नव्हती. त्यामुळेच डेल्टाने मोठ्या प्रमाणात लोकांना संक्रमित केलं होतं.'

विद्यासागर म्हणाले, 'आता देशात 75 ते 80 टक्के सीरो-प्रेवलेन्स आहे. 85% लोकांना पहिला डोस मिळाला आहे आणि 55% लोकांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. जे या साथरोगापासून 95% संरक्षण करते. त्यामुळे तिसऱ्या लाटेत तेवढ्या प्रमाणात रुग्ण समोर येणार नाहीत जेवढे दुसऱ्या लाटेत पाहायला मिळाले होते. तसेच दुसऱ्या लाटेच्या अनुभवातून आपण आपली क्षमताही निर्माण केली आहे. त्यामुळे आम्ही कोणत्याही अडचणीशिवाय त्याचा सामना करू शकतो.'

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in