'शेतकऱ्यांच्या बाजूने बोलणारी व्यक्ती भाजपसाठी ढोंगी, दहशतवादी असते'

नान पटोले यांची भाजपवर कडाडून टीका
'शेतकऱ्यांच्या बाजूने बोलणारी व्यक्ती भाजपसाठी ढोंगी, दहशतवादी असते'

शेतकऱ्यांच्या बाजूने बोलणारी भाजपसाठी दहशतवादी, ढोंगी असते. राकेश टिकैत यांच्यावरही असेच आरोप करण्यात आले असं म्हणत आज नाना पटोले यांनी भाजपवर टीका केली आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या विरोधातले कायदे करायचे आणि नंतर मग शेतकऱ्यांना दहशतवादी ठरवायचं त्यांना ढोंगी म्हणायचं हेच भाजपचं धोरण आहे असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

उत्तर प्रदेशातल्या लखीमपूरमध्ये झालेल्या घटनेचा आम्ही निषेध करतो. लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना चिरडण्यात आलं. या प्रकाराचं महाराष्ट्र भाजपकडून समर्थन केलं जात असेल तर ही गोष्टही निषेधार्ह आहे. आजच्या बंदला भाजपने जो विरोध केला त्याचाही आम्ही निषेध करतो आहे. उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांना चिरडण्यात आलं. त्याबद्दल सगळ्यांनीच चिंता करत होते. मात्र महाराष्ट्र भाजपने हे दाखवून दिलं की त्यांचं धोरण शेतकरी विरोधी आहे. आजचं आंदोलन हे शांततेत आणि जनतेच्या पाठिंब्याने झालं आहे. त्यामुळे जनतेचं समर्थनही महाविकास आघाडीसोबत आहे भाजपसोबत नाही हे स्पष्ट झालं आहे असंही नाना पटोले म्हणाले.

भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले नव्हते. आज रस्त्यावर लोक आंदोलनाला प्रतिसाद देत होते. शेतकऱ्यांचे मारेकरी जे आहेत त्यांना आजचं आंदोलन हे ढोंगीपणाच वाटणार. शेतकरी विरोधी धोरण राबवायचं आहे जो शेतकरी हिताचं धोरण राबवेल तो भाजपसाठी ढोंगी आणि दहशतवादी असतो असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

नैसर्गिक आपत्ती येते त्यावेळी केंद्र सरकारने आपलं पथक पाठवून नुकसानीची मदत पाठवली पाहिजे. मागच्या वर्षीची मदत करण्यासाठी यावर्षी पथक पाहणीसाठी आलं. महाविकास आघाडीची भूमिका अशी नाही. भाजप शेतकऱ्यांच्या बद्दल मगरीचे अश्रू ढाळतं आहे अशीही टीका नाना पटोले यांनी केली आहे.

'शेतकऱ्यांच्या बाजूने बोलणारी व्यक्ती भाजपसाठी ढोंगी, दहशतवादी असते'
Maharashtra Bandh Photo: कोणत्या शहरात कसं सुरु आहे 'महाराष्ट्र बंद' आंदोलन?

आज आंदोलना दरम्यान काही तुरळक ठिकाणी काही प्रकार घडले. मात्र काँग्रेसने अत्यंत शांतपणे आंदोलन केलं. राज्यपाल भवनात आम्ही ठिय्या मारून आंदोलन केलं. आमच्या आंदोलनात कुठेही हिंसा नव्हती असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे. भाजपने मात्र सातत्याने या देशातील नागरिकांचं हित पाहिलेलं नाही हेच दिसतं आहे. पेट्रोल आणि डिझेल यांची दरवाढ करण्यात आली आहे. तसंच सिलिंडरचे दरही वाढवले गेले आहेत हे अन्यायकारक आहे असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.