सचिन वाझेंच्या अडचणी वाढल्या, विश्वासू सहकारी रियाझ काझी माफीचा साक्षीदार होणार?

सौरभ वक्तानिया

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

NIA च्या अटकेत असलेल्या मुंबई पोलीस दलाचे माजी कर्मचारी सचिन वाझे यांच्या समोरील अडचणी काहीकेल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत. Crime Intelligence Unit मधील वाझेंचे विश्वासु सहकारी रियाझ काझी हे माफीचे साक्षीदार होण्यासाठी तयार असल्याचं कळतंय. NIA मधील सूत्रांनी याबद्दलची माहिती दिली आहे. सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर NIA ने रियाझ काझी यांचीही जवळपास ९ तास चौकशी केली.

सचिन वाझेंकडून अँटेलिया बाहेर रेकी?? NIA च्या अधिकाऱ्यांना संशय

काझी हे वाझे यांचे विश्वासू सहकारी मानले जात असल्यामुळे प्रत्येक दिवशी त्यांची चौकशी केली जात आहे. काझी यांनीच वाझे यांच्या साकेत सोसायटीमधून DVR ताब्यात घेतल्याचं बोललं जातंय. याव्यतिरीक्त नंबरप्लेट बनवण्यापासून आणखी काही गोष्टींमध्ये काझींनी वाझे यांना मदत केली होती. वाझे यांनी केलेल्या अनेक चुकीच्या कामांची काझी यांना माहिती आहे. याच कारणासाठी काझी यांना NIA माफीचा साक्षीदार करण्याच्या तयारीत आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान, API रियाझ काझी यांची NIA कडून काल (17 मार्च) तब्बल 9 तास चौकशी करण्यात आली. यावेळी रियाझ काझी यांना याबाबत काय-काय विचारणा करण्यात आली याविषयी कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.

NIA कार्यालयातून रियाझ काझी हे साधारण 10.15 वाजता बाहेर पडले. यावेळी माध्यामांनी या चौकशीबाबत त्यांच्याकडे प्रतिक्रिया देखील मागितली. मात्र, रियाझ काझी यांनी याविषयी काहीही बोलण्यास नकार दिला. दुसरीकडे सूत्रांच्या मते, या संपूर्ण प्रकरणात सचिन वाझेंसोबत सीआययूच्या इतर अधिकाऱ्यांवर देखील NIAची करडी नजर आहे. त्यामुळे आता वाझेंनंतर आणखी कोण-कोण अडकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

…Sachin Vaze हा विषय संपलेला नाही

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT