"एल्गार परिषदेला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न"

लेखिका आणि विचारवंत अरुंधती रॉय यांची मोदी सरकारवर टीका
Arundhati Roy
Arundhati Roy Photo- India Today

एल्गार परिषदेला सातत्याने बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो आहे असं वक्तव्य सुप्रसिद्ध लेखिका आणि विचारवंत अरुंधती रॉय यांनी व्यक्त केलं आहे. पुण्यातल्या एल्गार परिषदेत त्या बोलत होत्या. अनेक मुस्लिम विद्यार्थ्यांना बदनाम करण्यात आलं. त्यांनी केलेल्या आंदोलनाला कट असल्याचं भासवलं गेलं आणि अनेक विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करुन त्यांना तुरुंगात डांबण्यात आलं असाही आरोप रॉय यांनी केला. शाहीनबाग आंदोलनही दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला.

ब्राह्मण आणि वैश्य समाजाचा दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न मोदी सरकारकडून सातत्याने केला जातो आहे. दलित आणि ब्राह्मणेतर समाजावर अन्याय केला जातो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कायम काँग्रेसच्या घराणेशाहीवर कायम कडाडून टीका करतात. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी विशिष्ट कॉर्पोरेट घराण्यांनाच महत्त्व देतात असाही आरोप रॉय यांनी केला. रिलायन्स इंडस्ट्रीच्या हाती 27 टीव्ही चॅनल्सची सूत्रं आहेत कारण या चॅनल्सच्या शेअर्सवर रिलायन्सचा कब्जा आहे.

आणखी काय म्हणाल्या अरुंधती रॉय?

2018 निवडणूक बॉन्ड आयोजन करण्यात आलं ज्यामुळे राजकीय पक्षांना बेनामी पैसे देणं शक्य झालं आहे. त्यामुळे भाजप हा पक्ष जगातला सर्वात श्रीमंत पक्ष आहे. हिंदू राष्ट्र ही संकल्पना जाणीवपूर्वक राबवली जाते आहे. या संकल्पनेतून जनतेवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. जनतेवर अचानक हल्ले करायचे, नोटबंदीसारखे निर्णय घ्यायचे, जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 रद्द करुन अचानक लाखो लोकांवर एक लॉकडाउन लावला गेला. त्यांना पोलीस आणि लष्कराच्या नजरकैदेत रहावं लागलं असंही अरुंधती रॉय यांनी म्हटलं आहे.

उमर खालिद, खालिद सैफी, शरजील इमाम यांच्यासारख्या तरुण मुस्लिम आंदोलकांना जिहादी ठरवून तुरुंगात डांबण्यात आलं आहे. शाहीनबागमध्ये आंदोलन करणाऱ्या महिलांचीही प्रतिमा मलीन करण्यात आली असाही आरोप रॉय यांनी आपल्या भाषणात केला. मुस्लिमांशी जोडली गेलेली कोणतीही गोष्ट ही जिहाद आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो आहे हे खरोखरच दुर्दैवी आहे असंही अरुंधती रॉय यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in