Drugs Case: आर्यन खानचा तुरुंगातील मुक्काम वाढला; न्यायालयाने जामीन फेटाळला

कोर्टाने आर्यन खान आणि अरबाझ मर्चंट या दोघांचाही जामीन नाकारला आहे
Drugs Case: आर्यन खानचा तुरुंगातील मुक्काम वाढला; न्यायालयाने जामीन फेटाळला

आर्यन खान आणि अरबाझ मर्चंट या दोघांचाही जामीन कोर्टाने फेटाळला आहे. आर्यन खानचं काय होणार हा प्रश्न आज होताच. मात्र आता त्याला जामीन नाकारण्यात आला आहे. मॅजिस्ट्रेट कोर्टाने त्याला जामीन नाकारला आहे त्यामुळे आर्यन खानचा तुरुंगातला मुक्काम वाढला आहे.

आर्यन खान हा मागील 7 दिवसांपासून एनसीबीच्या ताब्यात आहे. मुंबईहून गोव्याला क्रूझ जहाजावर धावणाऱ्या ड्रग्स पार्टीचा भाग असल्याने त्याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ताब्यात घेतले होते. याच प्रकरणी आता न्यायालयीन कोठडीत असलेल्या आर्यनच्या जामीन अर्जावर मुंबईतील किला कोर्टात सुनावणी सुरु झाली आहे. दुसरीकडे आर्यनसह सर्व आरोपींना एनसीबीने आर्थर रोड तुरुंगात धाडलं आहे.

शनिवारी रात्री अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाने म्हणजेच NCB ने गेटवे ऑफ इंडिया येथील क्रूझवर असलेली ड्रग्ज पार्टी उधळून लावली होती. त्यावेळी आर्यन खान, अरबाझ मर्चंट, मुनमुन धमेचा यांच्यासह आठ जणांना ताब्यात घेतलं. नंतर या सगळ्यांना ड्रग्ज प्रकरणात अटक कऱण्यात आली. आर्यन खानची रवानगी गुरूवारीच 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. मात्र त्याचे वकील सतीश मानेशिंदे यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर आज सुनावणी झाली. या दरम्यान त्याला जामीन नाकारण्यात आला आहे.

आर्यन खान
आर्यन खान (फाइल फोटो)

आर्यन खान आणि इतर ५ आरोपींना जेलमध्ये बराक क्रमांक १ मध्ये ठेवण्यात येईल. ही बराक कोरोना काळात क्वारंटाईन करण्यासाठी वापरण्यात येत असून ती जेलमध्ये पहिल्या मजल्यावर आहे. सध्याच्या घडीला आर्यन खानला जेलचा युनिफॉर्म मिळणार नाहीये. या बराकमध्ये आर्यन खान आणि इतर आरोपींना ५ दिवस काढावे लागतील. जर त्यांच्यात कोरोनाची लक्षणं आढळली तर त्यांची चाचणी केली जाईल. परंतू आर्यन आणि इतर ५ आरोपींची याआधीच कोरोना चाचणी झाली असून तिचा निकाल निगेटीव्ह आला आहे. या सर्व आरोपींनी लसीचे दोन डोस घेतल्यामुळे त्यांना या बराकमध्ये ५ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण करावा लागेल.

या आरोपींना इतर कैद्यांप्रमाणेच वागणूक मिळणार असून, त्यांना फक्त जेलमधलं खाणं मिळणार आहे. बाहेरील खाणं त्यांना मिळणार नाही. NCB कोठडीत असताना आर्यन खान आणि इतर आरोपींसाठी बाहेरच्या खाण्याची सोय करण्यात आली होती.

सर्व आरोपींची जेलमधली दिनचर्या अशी असेल -

१) जेलमधले अधिकारी सकाळी ६ वाजता सर्व कैद्यांना उठवतील.

२) सकाळी सात वाजेपर्यंत सर्वांना नाश्ता मिळेल, ज्यात शिरा-पोहे असतील.

३) सकाळी ११ वाजेपर्यंत जेवणं दिलं जाईल. दोन्ही वेळच्या जेवणात पोळी-भाजी आणि डाळ-भात हेच खाणं मिळेल.

४) दुपारचं जेवण झाल्यानंतर कैद्यांना बराकबाहेर फिरण्याची मुभा दिली जाते. परंतू आर्यन आणि इतर आरोपींना ५ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण होईपर्यंत बाहेर येता येणार नाही.

५) जर आर्यन खान आणि इतरांना अधिकचं खाणं हवं असेल तर त्यांना ते जेलच्या कँटीनमधून विकत घ्यावं लागेल. त्यासाठीचे पैसे हे मनी ऑर्डरने मागवता येतील.

६) संध्याकाळचं जेवण हे ६ वाजेपर्यंत दिलं जाईल, अनेक कैदी हे जेवण रात्री ८ वाजता जेवतात.

Related Stories

No stories found.